
Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!
या घटनेत आर्यन सोमनाथ कांबळे (वय १८) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे, तर आदित्य एकनाथ मोंढे (वय २०, रा. शिरसगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्ग रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ ही रक्तरंजित आणि थरारक घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आर्यन कांबळे आणि आरोपीची बहीण यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, आर्यन आणि तरुणी हे दोघेही एकाच समाजाचे होते, तरीसुद्धा मुलीच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते. प्रेमसंबंधामुळे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याच्या चुकीच्या समजुतीतून आरोपी आदित्यच्या मनात आर्यनबद्दल तीव्र राग होता. यापूर्वीही त्यांच्यात वाद झाले होते.
घटनेच्या दिवशी आरोपी आदित्य याने आर्यनला आपल्या बहिणीसोबत असलेल्या संबंधांवर चर्चा करण्याच्या बहाण्याने सापगाव येथील स्मशानभूमीजवळ भेटण्यासाठी बोलावून घेतले. तिथे पोहोचताच दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. यादरम्यान राग अनावर झालेल्या आदित्यने आपल्याजवळ असलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि आर्यनच्या पोटावर, गळ्यावर, हातावर व छातीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात आर्यन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वेगाने तपास चक्रं फिरवली आणि आरोपी आदित्य मोंढे याला जेरबंद केले. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये खूनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहेत.
Ans: नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्ग रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली आहे.
Ans: मृत तरुण आणि आरोपीच्या बहिणीमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली.
Ans: बकेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी आदित्य मोंढे याला अटक केली असून त्याच्यावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.