Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: ५० रुपयांसाठी वाद विकोपाला; १८ वर्षीय रिक्षाचालकावर केला धारदार शस्त्राने वार, दोन तरुन अटक

नवी मुंबईत रिक्षाच्या भाड्यावरून झालेला फक्त ५० रुपयांचा वाद १८ वर्षीय रिक्षाचालकाच्या जीवावर बेतला. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या दोन तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून रिक्षा चालकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 01, 2026 | 04:38 PM
Navi Mumbai Crime: ५० रुपयांसाठी वाद विकोपाला; १८ वर्षीय रिक्षाचालकावर केला धारदार शस्त्राने वार, दोन तरुन अटक

Navi Mumbai Crime: ५० रुपयांसाठी वाद विकोपाला; १८ वर्षीय रिक्षाचालकावर केला धारदार शस्त्राने वार, दोन तरुन अटक

Follow Us
Follow Us:
  • किरकोळवादातुन रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या 
  • चालकाच्या मानेवर, डोक्यावर आणि हातावर वार करुन आरोपी पसार 
  • सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना घेतले ताब्यात
नवी मुंबई: फक्त ५० रुपयांच्या भाड्यावरून वाद झाला आणि १८ वर्षीय रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या दोन तरुणांनी वादानंतर चालकावर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी रिक्षा घेऊन पसार झाले. या प्रकरणाचा तपास करत नवी मुंबई गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांनी दोन्ही आरोपींना मानखुर्द परिसरातून अटक केली आहे.

मध्यरात्री रिक्षात बसले दोन प्रवासी

मृत रिक्षाचालकाचे नाव सुजनकुमार फेकू महतो (वय १८, रा. घणसोली) असे आहे. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी तो रिक्षा घेऊन प्रवासी वाहतुकीसाठी घराबाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातून दोन तरुण त्याच्या रिक्षात बसले. त्यांनी चालकाला मानखुर्द येथे जाण्यास सांगितले.

हेही वाचा:वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरचा मृत्यू; माजी मंत्र्यांच्या ओएसडीवर आरोप, आरोग्यमंत्र्यांनी दिलं कारवाईच आश्वासन

दुसरे भाडे मिळाल्याने प्रवाशांना उतरण्यास सांगितले

रिक्षा वाशीतील फोर्टिस हॉस्पिटलजवळील मिनी सी-शोर गार्डन परिसरात पोहोचल्यानंतर सुजनला दुसऱ्या प्रवाशाचा फोन आला. आपल्याला दुसरे भाडे मिळाले असल्याचे सांगत त्याने रिक्षातील दोन्ही प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. याच कारणावरून चालक आणि प्रवाशांमध्ये वाद झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही क्षणांतच गंभीर स्वरूपाचा झाला.

धारदार शस्त्राने हल्ला

वाद वाढल्यानंतर दोन्ही आरोपींनी सुजनवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या मानेवर, डोक्यावर आणि हातावर वार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजनचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याची रिक्षा ताब्यात घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

हेही वाचा: Acciend News: दर्शनावरून परतताना काळाचा घाला; किनवटजवळ भरधाव जीप झाडावर आदळली, चौघांचा मृत्यू, सहा गंभीर

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा कक्ष-१, मध्यवर्ती कक्ष आणि वाशी पोलिस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळासह आरोपींच्या संभाव्य मार्गावरील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. असून पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यात यश आले. त्यानंतर साहिल आनंदा सुर्वे (वय २०) आणि साहिल यशवंत खरात (वय २०) या दोघांना मानखुर्द परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

एका आरोपीवर यापूर्वीही गुन्हा

अटक करण्यात आलेल्या साहिल आनंदा सुर्वे याच्याविरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात तो ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून दोन्ही आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: Navi mumbai crime navi mumbai crime dispute over 50 escalates 18 year old auto rickshaw driver attacked with a sharp weapon two youths arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 04:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.