Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: कोपरखैरणे पोलिसांनी चोरीचा सहा तासात लावला छडा; सीसीटीव्ही फुटेज तपासुन दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

कोपरखैरणे येथे ५९ वर्षीय महिलेच्या गळ्यातील आठ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून नेल्याच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 30, 2026 | 01:52 PM
Navi Mumbai: नवी मुंबईत सहा तासांत गुन्हा उघडकीस, १२.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त; मोक्कासह १३ गंभीर गुन्हे दाखल

Navi Mumbai: नवी मुंबईत सहा तासांत गुन्हा उघडकीस, १२.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त; मोक्कासह १३ गंभीर गुन्हे दाखल

Follow Us
Follow Us:
  • आठ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकींसह १२.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • मुख्य आरोपी राहुल पवारवर मोक्कासह १३ गंभीर गुन्हे दाखल
  • सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांना सहा तासांत अटक
Navi Mumbai Crime News: बीएआरसीमध्ये कार्यरत असलेल्या ५९ वर्षीय महिला कर्मचाऱ्याला इमारतीच्या लॉबीत अडवून त्यांच्या गळ्यातील आठ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून नेल्याच्या प्रकरणाचा कोपरखैरणे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरीच्या पैशांतून खरेदी केलेली केटीएम ड्युक ३९० मोटारसायकल असा एकूण १२ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी लता सुब्रमण्यम यांचे (वय ५९ आणि रा. सेक्टर २ए, कोपरखैरणे) येथील असुन त्या १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कामावरून घरी परतत होत्या. त्या इमारतीच्या लॉबीत पोहोचल्या असता राहुल पांडुरंग पवार (वय ३५) याने मागून येत त्यांच्या गळ्याभोवती हात टाकला. त्याने त्यांच्या गळ्यातील ३.५ तोळ्यांची सोन्याची साखळी आणि ४.५ तोळ्यांचे मंगळसूत्र असा एकूण आठ तोळ्यांचा, सुमारे आठ लाख रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने खेचला. या झटापटीत लता सुब्रमण्यम खाली पडल्याने जखमी झाल्या.
दागिने हिसकावल्यानंतर आरोपी इमारतीबाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवरून पसार झाला.

हेही वाचा:

Acid Attack: नाते तुटल्याच्या रागातून माजी मंगेतरचे बिघडले मानसिक संतुलन; दोन सख्या बहिणींवर फेकले ॲसिड आणि…

कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेनंतर १८ ऑगस्ट रोजी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला. सुरुवातीला महापे ब्रिजवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. पोलिसांनी हार न मानता ऐरोली ते कोपरखैरणे या मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

पेट्रोल पंपावर सापडले आरोपी

या तपासादरम्यान रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळील शेल पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पेट्रोल भरताना आढळून आले. त्यावरून दुचाकीचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चालक ओमकेश अशोक साकोले (वय १९, रा. भीमनगर झोपडपट्टी, ऐरोली) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल पांडुरंग पवार याला ऐरोली सेक्टर चारमधून अटक केली.

१२ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी कारवाईदरम्यान आठ लाख रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली सुमारे ८० हजार रुपये किमतीची दुचाकी तसेच चोरीच्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून खरेदी केलेली ४ लाख १३ हजार रुपये किमतीची केटीएम ड्युक ३९० मोटारसायकल जप्त केली. त्यामुळे एकूण १२ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

आरोपीवर या पुर्वीच १३ गुन्हे दाखल

दरम्यान, मुख्य आरोपी राहुल पवार हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यावर २००६ ते २०२५ या कालावधीत तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच २०११ ते २०२३ या कालावधीत तो मोक्का कायद्यांतर्गत तुरुंगात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास कोपरखैरणे पोलीस करीत आहेत.

Web Title: Navi mumbai crime solved within six hours property worth 1293 lakh seized 13 serious cases registered including under mcoca

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.