
Dnyaneshwar Katke accident:
Dnyaneshwar Katke accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने एका चार वर्षांच्या बालिकेला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेमुळे बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (३० नोव्हेंबर) ला शिरूर जवळील बोऱ्हाडे मळा याठिकाणी हा अपघात घडला शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे असे या बालिकेचे नाव आहे. पण त्याचवेळी शुभ्रा एकटीच रस्ता ओलांडत असताना तिचे पालक कुठे होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार कटके शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरला निघाले होते. बोऱ्हाडे मळा येथील ह्युंदाई शोरुमसमोर शुभ्रा बोऱ्हाडे खेळत होती. पण त्याचवेळी एका कारच्या आडून ती अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सडिज कार (MH12 NX 1391) समोर आली. कटके यांच्या कारचालकाने जोरदार ब्रेक दाबला. पण गाडीच्या वेगामुळे शुभ्राला जोरदार धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फूट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. या धडकेमुळे शुभ्रा गंभीर जखमी झाली. आमदार कटके आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी कारमधून उतरत तिच्याकडे धाव घेत तिला उचलून तातडीने हास्पिटलमध्ये दाखल केले. पण तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Accident News)
दरम्यान, शिरूर नगरपरिषदेचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. शिरूरची निवडणूक आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठेची बनवली असून, प्रचारासाठी वेळेत पोहोचण्याच्या प्रयत्नात नेतेमंडळींची धावपळ सुरू आहे. आज शिरूरमधील प्रचारात्मक पदयात्रेला वेळेत पोहोचण्यासाठी आमदार कटके वाघोलीहून शिरूरकडे भरधाव येत असताना हा अपघात झाला. नेत्यांच्या या धावपळीचाच परिणाम शुभ्रा सारख्या सर्वसामान्य बालिकेच्या जीवावर झाला, अशी चर्चा शिरूर शहर आणि तालुक्यात रंगत आहे. ( Maharashtra Local Body Election)
December 2025 festival list: मोक्षदा एकादशीपासून दत्त जयंतीपर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत जाणून घ्या
पोलिस प्रशासनाची लपवाछपवी या घटनेत प्रकर्षाने दिसून आली. आमदार कटके यांच्या कारने चार वर्षीय बालिकेला धडक दिल्याची माहिती क्षणात संपूर्ण शिरूर शहरात पसरली. मात्र या गंभीर अपघाताबाबत ना रुग्णालयाकडून पोलिसांना कोणतीही खबर देण्यात आली, ना तक्रार करण्यासाठी कोणी पोलिस ठाण्यात आले. त्यामुळे या घटनेची आम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर पोलिस प्रशासनाकडून देण्यात येत होते. यामुळे नेमकी ही लपवाछपवी कोणासाठी? आमदारांकडून पोलिसांवर काही दबाव टाकण्यात आला होता का? असा प्रश्न उपस्थित होत असून, शिरूर शहरात या संदर्भातील चर्चा चांगलीच रंगली आहे.
Ans: या अपघातात चार वर्षीय शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: शुभ्रा रस्ता ओलांडत असताना आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारसमोर अचानक आली. कारचालकाने ब्रेक दाबला तरी गाडीचा वेग जास्त असल्याने तिला जोरदार धडक बसली.
Ans: धडक बसताच आमदार कटके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने शुभ्राला उचलून स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात आले.