डिसेंबरमध्ये किती दिवस राहणार शाळा बंद (फोटो सौजन्य - iStock)
बऱ्याच शाळांनी परीक्षांमुळे सुट्ट्या दिल्या नाहीत. परिणामी, सर्वजण डिसेंबरच्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत होते. डिसेंबरमध्ये नऊ निश्चित सुट्ट्या आणि शनिवार आणि रविवार अशा सुट्टी दिसून येत आहेत. मात्र याव्यतिरिक्त, प्रत्येक शाळेचे सुट्टीचे कॅलेंडर वेगळे असते. राज्यानुसार सुट्ट्यांचे कॅलेंडरही बदलते. डिसेंबर २०२५ च्या सुट्टीच्या कॅलेंडरसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
डिसेंबरमध्ये शाळा किती दिवस बंद राहतील?
डिसेंबर २०२५ मध्ये हिवाळी सुट्ट्यांव्यतिरिक्त, काही निश्चित सुट्ट्यादेखील आहेत. काही देशभर लागू आहेत, तर काही राज्य-विशिष्ट आहेत. डिसेंबरमध्ये किती दिवस शाळा बंद राहतील ते जाणून घ्या:
दिल्लीवासीय सध्या कडाक्याच्या थंडीची सुरुवात होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिवाळा आधीच सुरू झाला आहे. हवामानामुळे शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. बहुतेक शाळा आता सकाळी ८ किंवा ९ वाजता उघडतात. दरम्यान, मुले २०२५ च्या हिवाळी सुट्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिवाळी सुट्ट्या हवामानानुसार, म्हणजेच तापमानानुसार ठरवल्या जातात. म्हणून, प्रत्येक राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असतात. दरम्यान महाराष्ट्रात २५ डिसेंबर ते १ जानेवारी हमखास शाळा बंद असतात. दरवर्षी ख्रिसमसची ७ दिवस सुट्टी शाळेला देण्यात येते. ४ शनिवार – रविवार आणि ख्रिसमस सुट्टी असे धरून साधारण अर्धा महिना मुलं शाळेत जाणार नाहीत हे नक्की!
मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न! ठाण्यात ‘मराठी शाळा कृती समिती’ची स्थापना






