Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paperleak Case: नीट पेपरफुटीत सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; लातूरच्या नामांकित बालरोगतज्ज्ञाला अटक

NEET Paperleak Case Update: प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे यांचे P. V. Kulkarni आणि शिवराज मोटेगावकर यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून हे नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 21, 2026 | 09:57 AM
NEET 2026 paper leak case, CBI arrest in Pune, Dr Manoj Shirure arrested

NEET 2026 paper leak case, CBI arrest in Pune, Dr Manoj Shirure arrested

Follow Us
Follow Us:
  • CBI कडून  पुण्यातून एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरला अटक
  • डॉ. मनोज शिरुरे यांनी शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) याच्याकडून पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय
  • डॉ. शिरुरे यांचे पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्याशी संबंध असल्याचे समोर
NEET Paperleak Case :  देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक मोठी कारवाई करत पुण्यातून एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. मनोज शिरुरे असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून, स्वतःच्या मुलासाठी फुटलेला NEET पेपर खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली ही पहिली अटक असल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, डॉ. मनोज शिरुरे यांनी शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) याच्याकडून पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय आहे. सीबीआयने त्यांना लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

Nashik Crime: मन सुन्न करणारी घटना! प्रेमविवाहानंतर विवाहितेचा छळ; ‘तुझ्या मुलांना स्वीकारणार नाही’ म्हणत 8

डॉ. शिरुरे हे लातूर शहरातील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत. रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या सीबीआयच्या पथकाने त्यांच्या रुग्णालयात छापा टाकत साडेचार तास कसून चौकशी केली. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे यांचे पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून हे नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा घोटाळा केवळ एका वर्षापुरता मर्यादित नसून, संघटित रॅकेटच्या माध्यमातून अनेक वर्षे सुरू असल्याची शक्यता तपासली जात आहे.

दरम्यान, सीबीआयच्या तपासातून NEET पेपरफुटीची संपूर्ण ‘मोडस ऑपरेंडी’ समोर आली आहे. तपासानुसार, शिवराज मोटेगावकरने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचला होता. त्याने आपल्या कोचिंग क्लासमधील सहकाऱ्यांना नॅशनल टेस्टींग एजन्सी ( National Testing Agency) च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर नियुक्त करून घेतले. त्यामध्ये Manisha Mandhare आणि पी. व्ही. कुलकर्णी यांचा समावेश होता.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कुलकर्णी यांनी केमिस्ट्री तर मनीषा मांढरे यांनी बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लक्षात ठेवले. प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी प्रश्न तोंडपाठ करून नंतर हाताने लिहून काढले आणि ते मोटेगावकरकडे पाठवले. मोटेगावकरने हे प्रश्न PDF स्वरूपात मोबाईलमध्ये सेव्ह करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना लाखो रुपयांच्या बदल्यात विकल्याचा आरोप आहे.

Pharmacy Colleges Ban : मुख्यमंत्र्यांनी फार्मसी कॉलेजेसवर का घातली बंदी? जाणून घेण्यासाठी एकदा

३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरने मोबाईलमधील डेटा डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले. मात्र, सीबीआयने डिजिटल डेटा रिकव्हर करून महत्त्वाचे पुरावे मिळवले आणि त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणात आतापर्यंत प्रश्नपत्रिका फोडणारे आणि विकणाऱ्या आरोपींवर कारवाई झाली होती. मात्र, आता स्वतःच्या मुलासाठी पेपर विकत घेणाऱ्या पालकावरही कारवाई झाल्याने NEET पेपरफुटी प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. देशभरातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेवर यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आणखी काही मोठ्या नावांचा तपासात उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Neet 2026 leak case cbi makes big move in pune prominent pediatrician arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • CBI
  • NEET
  • NEET exam scam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.