नेमकं काय प्रकरण?
पीडित महिलेने प्रेम विवाह केला होता. मात्र लग्न झाल्यापासूनच ‘तू आमच्या जातीची नाहीस’ असे टोमणे तिला मारले जात होते. महिला गर्भवती राहिल्याचे सासूला समजल्यानंतर सासू कडून ‘तू आमच्या जातीची नाहीस तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही असे सांगत गर्भपातासाठी दबाव आणत आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे सासरच्या लोकांनी पीडित महिलेचा तब्बल आठ वेळा गर्भपात घडवून आणला. तसेच सासू-सासर्याकडून वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला जात होता. तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालय यात ऍडमिट करू अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालयात ऍडमिट करू अशी धमकी दिलाचाही आरोप पीडितेने केला आहे. पुण्यातील नोकरी गेल्यानंतर महिला जुलै 2025 मध्ये नाशिकला आल्यानंतर छळ अधिक वाढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
नाशिक मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी तिच्या पतीने तिचे सोन्या-चांदीच्या दागिने मोडून पैसे घेतले होते. पैशांसाठी आणि हुंड्यासाठी देखील तिचा छळ केला जात होता. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेचा पती विजय महाजन, सासू निर्मला दशरथ महाजन, सासरा दशरथ महाजन या तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षेचा आणि हुंडाबळीचा प्रकरण समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
Buldhana Crime: नात्याला काळिमा! मुलानेच केली वडिलांची हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
Ans: सासरच्यांनी जातीच्या कारणावरून तिचा छळ करून 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
Ans: पती विजय महाजन, सासू निर्मला महाजन आणि सासरे दशरथ महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Ans: महिलेचे दागिने विकून पैसे घेतल्याचा आणि हुंड्यासाठी छळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.






