Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; राहुरीतून मुख्य संशयित धनंजय लोखंडे अटकेत

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून मुख्य संशयित धनंजय लोखंडे याला अटक केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 13, 2026 | 03:19 PM
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; राहुरीतून मुख्य संशयित धनंजय लोखंडे अटकेत

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; राहुरीतून मुख्य संशयित धनंजय लोखंडे अटकेत

Follow Us
Follow Us:

पोपट पिटेकर, अहिल्यानगर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून, सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून मुख्य संशयित धनंजय लोखंडे याला बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेमुळे पेपरफुटीच्या रॅकेटमधील अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

धनंजय लोखंडे हा मूळचा राहुरी परिसरातील रहिवासी असून तो गेल्या काही दिवसांपासून या भागात असल्याची खात्रीशीर माहिती सीबीआयला मिळाली होती. या मोहिमेची गोपनीयता पाळत सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके सीबीआयच्या मदतीला देण्यात आली होती.

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई; ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात

संयुक्त कारवाई आणि अटक

सीबीआय आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने राहुरी परिसरात सापळा रचून लोखंडेला शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला तातडीने अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले, तिथे प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता आणि काही वेळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आले असून, काल रात्रीपासून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

पुणे कनेक्शन आणि तपासाचे मुद्दे

संशयित धनंजय लोखंडे हा गेल्या काही काळापासून पुण्यातील वाघोली भागात वास्तव्यास होता. त्यामुळे या रॅकेटचे जाळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात किती खोलवर पसरले आहे, याचा तपास आता सीबीआय करत आहे. प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर सीबीआयचा फोकस आहे:

रॅकेटमधील भूमिका: पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीत लोखंडेचे नेमके काम काय होते?

आर्थिक व्यवहार: विद्यार्थ्यांकडून गोळा केलेली रक्कम कोणापर्यंत पोहोचवण्यात आली?

मोठे मासे: लोखंडेच्या संपर्कात असलेले शिक्षण क्षेत्रातील बडे दलाल किंवा अधिकारी कोण आहेत?

अहिल्यानगर जिल्ह्यात झालेली ही कारवाई नीट प्रकरणाच्या तपासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. या अटकेमुळे राज्यातील पेपरफुटीच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत.

NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?

Web Title: Neet paper leak cbi arrests main suspect dhananjay lokhande from rahuri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • NEET Exam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
1

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.