Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET पेपरफुटीचा ‘नाशिक’ पॅटर्न उघड! हरियाणा ते बिहार पसरले धागेदोरे; नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक

NEET Paper Leak Case: NEET-UG 2026 पेपरफुटीचे नाशिक कनेक्शन उघड झाले आहे. नाशिकमधून एका संशयिताला अटक करण्यात आली असून सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. परीक्षा रद्द करण्यात आली असून लवकरच नवीन तारखा जाहीर होतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 12, 2026 | 05:28 PM
नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक (Photo Credit- X)

नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • NEET पेपरफुटीचा ‘नाशिक’ पॅटर्न उघड!
  • हरियाणा ते बिहार पसरले धागेदोरे
  • नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक
नाशिक: वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET-UG 2026’ प्रकरणातील पेपरफुटीचे गूढ आता उलगडू लागले असून, या संपूर्ण प्रकरणाचे केंद्रस्थान नाशिक असल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका छापण्यापूर्वीच ती नाशिकमधून फुटल्याचा खळबळजनक खुलासा तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने एका संशयिताला बेड्या ठोकल्या असून पेपरफुटीचा संपूर्ण ‘ट्रॅव्हल रूट’ आता स्पष्ट झाला आहे.

असा होता पेपरफुटीचा ‘ट्रॅव्हल रूट’

NEET पेपरफुटीच्या प्रवासाचा मार्ग आता समोर आला आहे. नाशिकमध्ये छपाई होण्यापूर्वीच हा पेपर फुटला होता. नाशिकहून हा फुटलेला पेपर हरियाणातील गुरुग्राम येथे नेण्यात आला. हरियाणात, या फुटलेल्या पेपरचे १० संच (सेट्स) तयार करण्यात आले. हरियाणानंतर, हा पेपर राजस्थानमधील जयपूर येथे पोहोचला. जयपूरहून तो जमवा रामगड आणि त्यानंतर सिकर येथे गेला. अखेरीस, हा फुटलेला पेपर जम्मू-काश्मीर, बिहार आणि केरळपर्यंत पोहोचला. केरळनंतर, तो आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पोहोचला.

On inputs from Rajasthan Police, the Nashik City Crime Branch arrested a youth named Shubham Khairnar from the Indira Nagar area in connection with the NEET paper leak case, and he will be handed over to Rajasthan Police, which will further transfer him to the CBI: Nashik Police pic.twitter.com/6PA6Jj7Yc0 — IANS (@ians_india) May 12, 2026

ओळख लपवण्यासाठी मुंडण

नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि फोटोंच्या मदतीने अवघ्या एका तासात ३० वर्षीय संशयित आरोपीला अटक केली. हा आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी असून तो BAMS च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. अटक टाळण्यासाठी त्याने आपले डोके मुंडवून वेशभूषा बदलली होती. नाशिक पोलीस या आरोपीला पुढील तपासासाठी राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

तपासाची चक्रे फिरली; आता ‘सीबीआय’कडे सूत्रे

केंद्र सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संपूर्ण तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. सीबीआय लवकरच या प्रकरणी नियमित गुन्हा दाखल करून विशेष पथकाची स्थापना करणार आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SOG) सर्व कागदपत्रे आणि पुरावे सीबीआय आपल्या ताब्यात घेणार आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) परीक्षेचे सर्व रेकॉर्ड्स तपासले जातील.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा रद्द; पुनर्परीक्षेची घोषणा

३ मे २०२६ रोजी झालेली ‘NEET-UG 2026’ परीक्षा केंद्र सरकारने अधिकृतपणे रद्द केली आहे. या निर्णयामुळे सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेचा बोजा पडणार असला तरी, पारदर्शकता राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

  • नवे रजिस्ट्रेशन नको: ज्या विद्यार्थ्यांनी मे २०२६ च्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.
  • अतिरिक्त शुल्क नाही: पुनर्परीक्षेसाठी कोणतेही नवीन शुल्क आकारले जाणार नाही.
  • नवे वेळापत्रक: परीक्षेच्या तारखा आणि नवीन प्रवेशपत्रे (Admit Card) लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जातील.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच लक्ष द्यावे.

NEET UG 2026 Cancelled : नीट परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार?

Web Title: Neet ug 2026 paper leak nashik connection revealed cbi probe starts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Nashik
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
3

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
4

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.