मॉर्निंग वॉक करून घरी परत असताना व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या (फोटो सौजन्य-X)
Delhi Crime Marathi News: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गुन्हेगारी संपायचं नाव घेत नाही. कायद्याबाबत गुन्हेगारांच्या मनात मनात कोणत्याही प्रकारची भीती नसल्याचे दिसून येते. दरम्यान आज (7 डिसेंबर) सकाळी शाहदरा भागातील फरशी बाजारात धक्कादायक घटना समोर आली. मॉर्निंग वॉक करुन घरी परत असताना एका व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. व्यापारावर 7 ते 8 गोळ्या झाडण्यात आल्या. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आधी व्यापाऱ्याची गाडी थांबवली आणि नंतर गोळ्या झाडल्या. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला असून, अरविंद केजरीवाल यांनी या घटनेनंतर केंद्र सरकारवर टिका केली.
या दोन जणांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या असून अनेक राऊंड गोळीबारानंतर एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच दिल्ली क्राईम ब्रँचला घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती देताना डीसीपी शाहदरा यांनी सांगितले की, दिल्लीतील फरश बाजार पोलीस स्टेशन परिसरात सुनील जैन या व्यक्तीवर गोळी झाडण्यात आल्याचे वृत्त मिळाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी
शाहदरा डीसीपी पुढे म्हणाले की, शाहदरा जिल्ह्यातील विश्वास नगरमध्ये नाल्यावरून तरुणावर 7-8 गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संजय जैन असे त्याचे नाव असून तो भांड्यांचा व्यवसाय करतो. फरशी मार्केटमध्ये पोलीस तपास करत आहेत. यामध्ये दोन जणांना गोळ्या लागल्या आहेत, यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमीला मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे संजय किचन नावाने दुकान आहे.
शाहदरा भागातील या घटनेवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. केजरीवाल म्हणाले की, अमित शहांनी दिल्लीचा नाश केला. दिल्लीला जंगलराज बनवले. आजूबाजूचे लोक दहशतीचे जीवन जगत आहेत. भाजप आता दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखत नाही. दिल्लीतील जनतेला संघटित होऊन आवाज उठवावा लागेल.
दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, क्राइम कॅपिटल – शाहदरा जिल्ह्यात सकाळी गोळीबाराचा आवाज आला, जेव्हा भांडी व्यापारी संजय जैन त्यांच्या मॉर्निंग वॉकनंतर त्यांच्या स्कूटरवरून घरी परतत होते. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. 6 ते 7 राउंड गोळीबार करण्यात आला आणि सर्व गोळ्या संजय जैन यांना लागल्याचे सांगण्यात येत आहे.