Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी ‘स्टफ्ड छोले कुलचे’, चटपटीत चव पंजाबचा फील आणेल

Chole Kulche Recipe : छोले कुलचे हा पंजाबचा फेमस स्ट्रीट फूड आहे. यात मसालेदार छोले मऊदार कुलचेमध्ये स्टफ्ड केले जातात. पुदिन्याच्या चटणीसोबत याची चव आणखीनच छान लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2026 | 03:38 PM
काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी 'स्टफ्ड छोले कुलचे', चटपटीत चव पंजाबचा फील आणेल

काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी 'स्टफ्ड छोले कुलचे', चटपटीत चव पंजाबचा फील आणेल

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्लीचा फेमस पदार्थ म्हटला की यात छोले कुलच्यांच नाव प्रथमस्थानी.
  • हा चटपटीत पदार्थ पार्टीत सर्व्ह करण्यासाठीही उत्तम पर्याय आहे.
  • चला अमृतसरी चटपटीत छोले कुलचे घरी कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.
दिल्लीच्या गल्लीबोळातून संपूर्ण भारतात लोकप्रिय झालेली छोले कुलचे ही एक अशी डिश आहे जी नुसती चवच नाही तर एक अनुभव देते. मसालेदार, खमंग आणि सुगंधी छोले आणि त्यासोबत मऊ, हलके आणि बटरी कुलचे हा कॉम्बिनेशन कुणालाही मोहवणारा आहे. आज आपण या प्रसिद्ध स्ट्रीट फूडला थोडं वेगळं आणि खास ट्विस्ट देणार आहोत, ते म्हणजे स्टफ्ड छोले कुलचे.

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

या रेसिपीत कुलच्यांच्या आत मसालेदार चोले स्टफ केले जातात, ज्यामुळे प्रत्येक घासात भरपूर चव मिळते. बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊ कुलचे, त्यात खमंग चोले, कांदा, हिरवी मिरची आणि खास मसाल्यांचा परफेक्ट मेळ ही डिश ब्रेकफास्ट, लंच किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी उत्तम ठरते. पाहुण्यांसाठी काहीतरी वेगळं आणि हटके बनवायचं असेल, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून, अगदी ढाबा-स्टाइल चव मिळवता येते. चला तर मग, दिल्लीच्या स्ट्रीट फूडची चव आता तुमच्या स्वयंपाकघरात कशी आणायची ते जाणून घेऊया.

 साहित्य

छोलेसाठी: 

  • उकडलेले पांढरे चणे – 1 कप
  • कांदा (बारीक चिरलेला) – 1
  • टोमॅटो (बारीक चिरलेला) – 1
  • हिरवी मिरची – 1
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • छोले मसाला – 1 टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 टेबलस्पून
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
कुलच्यासाठी
  • मैदा – 2 कप
  • दही – ½ कप
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • बेकिंग सोडा – चिमूटभर
  • साखर – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 1 टेबलस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • बटर/तूप – भाजण्यासाठी
मकरसंक्रांतीनिमित्त घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवा रसाळ आणि स्वादिष्ट मालपुआ, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतावा. कांदा हलका गुलाबी झाला की आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतवा.
  • त्यानंतर टोमॅटो घालून मिश्रण मऊ होईपर्यंत शिजवा.
  • आता यात सर्व मसाले आणि उकडलेले चणे घालून नीट मिसळा. 5–7 मिनिटे परतून शेवटी कोथिंबीर घाला. तुमचे छोले तयार आहेत.
  • कुलचे तयार करण्यासाठी मैदा, दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, मीठ आणि तेल एकत्र मिसळा. थोडं
  • थोडं पाणी घालून मऊ पीठ मळा आणि मग ओल्या कपड्याने झाकून 2 तास ठेवून द्या.
  • तयार पिठाचे गोळे तयार करून यावर चिरलेली कोथिंबीर चिपकवून छान कुलचे हातानेच तयार करा.
  • तयार कुलचा तव्याला चिटकवून तवा गॅसच्या फ्लेमवर उलटा करा आणि मंद फ्लेमवर याला भाजून घ्या.
  • आता तयार कुलच्याला बटर लावा, त्याला मधून फाडून याच्या मध्ये तयार छोलेची भाजी भरा आणि याची मजा घ्या.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात पुदिन्याची चटणीदेखील घालू शकता.
  • तुम्ही कुलच्यांच्या मध्ये भाजीला स्टफ्ड न करतानाही भाजी चपातीप्रमाणेही याला खाऊ शकता.

Web Title: How to make amritsari stuffed chole kulche recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • delhi
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Summer Special : आंब्यांचा सीजन संपायच्या आत घरी बनवा ‘मँगो रसमलाई’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश
1

Summer Special : आंब्यांचा सीजन संपायच्या आत घरी बनवा ‘मँगो रसमलाई’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

दिल्ली हादरली! राजधानीत 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरू
2

दिल्ली हादरली! राजधानीत 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरू

Delhi Terror Plot : दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळला! ISI चे 9 एजंट अटकेत; सुरक्षाबळांवर हल्ल्याचा कट उघड
3

Delhi Terror Plot : दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळला! ISI चे 9 एजंट अटकेत; सुरक्षाबळांवर हल्ल्याचा कट उघड

Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम
4

Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.