
Nitesh Rane, Unattended bag, Suspicious bag,
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवासर बॅग आढळून आली. त्यानंतर ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिस तातडीने नितेश राणेंच्या निवासस्थानी दाखल झाली. त्यांनी संशयास्पद बॅगची तपासणी केली. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला होता. पण या बॅगेत नेमके काय आहे, याबाबत या घटनेची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, ती बॅग नेमकी कुणाची, ती कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आली, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिस सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तपासानंतरच हा घातपाताचा प्रयत्न होता की निष्काळजीपणा हे स्पष्ट होईल.
मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर संशयास्पदरीत्या एक बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या बॅगमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यामध्ये “या बॅगमध्ये बूट आणि कपडे आहेत. ते तुम्ही मोफत घेऊ शकता,” असा मजकूर लिहिलेला आहे. घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एका तरुणाने ही बॅग बंगल्याबाहेर ठेवून जात असल्याचे दिसून आले. याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, बॅगची सखोल तपासणी सुरू आहे. संबंधित तरुण नेमका कोण होता आणि बॅग तिथे ठेवण्यामागील उद्देश काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.
मागील काही वर्षांपासून मंत्री नितेश राणे हे आपली हिंदुत्ववादी भूमिका आक्रमकपणे मांडत असल्यामुळे चर्चेत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असून, अशा परिस्थितीत त्यांच्या निवासस्थानाबाहेर बेवारस बॅग आढळल्याने संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार घातपाताचा आहे की केवळ गैरसमज, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, अलीकडच्या काळात नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी प्रचार पद्धतीमुळे त्यांना धमक्यांचे प्रकारही घडल्याचे समोर आले होते. विविध ठिकाणी झालेल्या वादग्रस्त भाषणांमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत. सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेला वेगळे राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.