सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या; कळमनुरीच्या शिवारात गळफास घेऊन संपवलं जीवन
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणांवरून खून, खुनाचे प्रयत्न आणि आत्महत्या यांसारखे प्रकार दिसून येत आहे. असे असताना आता ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका व्यक्तीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 48 वर्षीय व्यक्तीने सात मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. घोडबंदर रोडवरील कावेसर परिसरात 24 जानेवारी रोजी संध्याकाळी ही घटना घडली. कासारवडावली पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आत्महत्या केलेली व्यक्ती त्याच्या घरी झालेल्या भांडणामुळे नाराज होती. त्यानंतर तो त्याच्या घरच्या इमारतीच्या टेरेसवर गेला आणि तेथून उडी मारली. दरम्यान, काही लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी मृतदेह पाठवला पोस्टमॉर्टमसाठी
पोलिसांनी सांगितले की, सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आणि अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ जानेवारी रोजी घडली.
डॉक्टर महिलेची आत्महत्या
दुसऱ्या घटनेत, पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
दुसरीही मुलगीच झाल्याने आणि चारित्र्याच्या संशयावरुन होणार्या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वाती अमोल ऐवळे (वय २३ रा. कोरोची) असे विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन शहापूर पोलिसात पती अमोल ऐवळे, सासरा हनमंत ऐवळे, सासू सुरेखा ऐवळे आणि दीर राजू ऐवळे (सर्व रा. कोरोची) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरेश महादेव बिरलिंगे (वय ४३ रा. मेडद रोड ता. माळशिरस जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.