Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत गाडी पार्किंगच्या वादातून राडा, एकाचा दुर्दैवी मृत्यू

ट्रक चालकाचा आणि चार दुचाकी चालवणाऱ्या गटामध्ये पार्किंगवरून वाढ झाला. दोन्ही गटांमधील वाद चिघळला, दुचाकी चालवणाऱ्या तरुणांच्या टोळक्याने गोदामातील कामगार आणि बबलूला मारहाण केली. गोदामातील लोक गोदाम सोडून पळून गेले. या वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण परसरले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 16, 2024 | 01:32 PM
डोंबिवलीत गाडी पार्किंगच्या वादातून राडा, एकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली : डोंबिवलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीमध्ये गाडी पार्कींगवरुन झालेल्या वादामुळे काही तरुण आपसात भिडले आणि या वादामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीती गोळवली परिसरात घडली आहे. बबलू गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आधी दोन गट आपसात भिडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उपचारा दरम्यान बबलू गुप्ता याचा मृत्यू झाल्याने पोलीस पोस्टमार्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत.

नक्की प्रकरण काय?

डोंबिवली पूर्वेतील गोळवली परिसरात बबलू बद्रीनाथ गुप्ता या व्यक्तीचे पेपरचे गोदाम आहे. १३ ऑगस्टच्या रात्री मोहम्मद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली पिक अप गाडी घेऊन गोदामासमोर आला. गोदामासमोर तीन ते चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. चालकाने त्या तरुणांना सांगितले की, दुचाकी बाजूला करा मला त्याठिकाणी पिकअप गाडी उभी करायची आहे. चालक गाडी मागे पुढे करीत असताना तरुणांचा आणि चालकाचा वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. गोदामामध्ये असलेले कामगार आणि बबलू गुप्ता हे गोदामा बाहेर आले. तोपर्यंत तरुणाच्या गटाने जवळपास २० पेक्षा जास्त तरुणाना बोलावून घेतले होते. पुन्हा तरुणांच्या टोळक्याने गोदामातील कामगार आणि बबलूला मारहाण केली. गोदामातील लोक गोदाम सोडून पळून गेले. बबलू मात्र त्याच ठिकाणी होता.

हेदेखील वाचा – भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑलिम्पिक खेळाडूंचे काही खास क्षण

दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यावर पाहिले तर बबलू गोदामासमोर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला रुग्णलायात दाखल केले. उपचारा दरम्यान बबलू याचा मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. बबलूचा मृत्यू मारहाणीमुळे झाला आहे का? यासाठी पोलीस पोस्टमार्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे. बबलू याच्या वर गॅस सिलेंडरचा बाटला टाकला होता. तो आजारी देखील होता. आत्ता मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. गाडी पार्किंगच्या वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण परसरले आहे.

Web Title: One man in dombivli lost his life in argument over car parking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 01:32 PM

Topics:  

  • Dombivli News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.