भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भेट घेतली. यावेळी त्यांनी ऑलिम्पिकमधील खेळाडूंशी संवाद साधला, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या खेळांबद्दल प्रश्न देखील केले. यावेळी खेळाडूंनी त्यांना सविस्तर उत्तर सुद्धा दिली आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास विशेष भेटवस्तु देखील दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंशी खास संवाद - फोटो सौजन्य - नरेंद्र मोदी युट्युब चॅनेल
भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी ऐतिहासिक महिला मनु भाकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष पिस्तूल भेटवस्तु दिली आहे.
भारताचा रायफल शुटर स्वप्नील कुसाळे याने महाराष्ट्राचे दैवत गणेशमूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली.
भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने त्यांना त्याचे रॅकेट भेट दिले आहे. त्याचबरोबर त्याचे कौतुक केले पंतप्रधानांनी केले आहे.
पंतप्रधानांनी कार्यक्रम झाल्यानंतर देखील खेळाडूंशी आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफसोबत देखील चर्चा केली.
भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने पंतप्रधानांना त्याची जर्सी भेट दिली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे सर्वांसमोर भरभरून कौतुक केले.
भारताची युवा जलतरणपटू धिनिधी देसिंघू हिच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
भारतीय हॉकी संघाने पंतप्रधानांना हॉकी स्टिक भेट दिली आणि भारताचा दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेशने त्याची जर्सी नरेंद्र मोदींना भेट दिली.