Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: आधुनिक सुविधांनी सज्ज होणार सावित्रीबाई फुले नाट्यगृह; पुनर्विकासासाठी ३० कोटी मंजूर

Dombivli News: डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने आणखी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आधुनिक सुविधांनी सज्ज नाट्यगृहाच्या उर्वरित कामांना आता गती मिळण्याची शक्यता आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 05, 2026 | 09:35 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाकडून आणखी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर.
  • ४ नोव्हेंबर २०२६ रोजी नगरविकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
  • खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा केला.
 

डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकास प्रकल्पाला अखेर आर्थिक बळ मिळाले आहे. नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीत आता आणखी ३० कोटींची भर पडल्याने या प्रकल्पासाठी एकूण ४५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाट्यगृहाच्या उर्वरित कामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, डोंबिवलीकरांना नव्या आणि आधुनिक सुविधांनी सज्ज नाट्यगृहाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा मोठा वाटा डोंबिवलीला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले नाट्‌यगृहाचा मोठा वाटा आहे. अनेक वर्षे या नाट्यगृहात नाट्यप्रयोग, संगीत मैफली, साहित्यिक कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक सोहळे रंगत होते. स्थानिक कलाकारांपासून नामवंत कलावंतांपर्यंत अनेकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ होते. मात्र, इमारत जीर्ण झाल्याने नाट्यगृह बंद करावे लागले. परिणामी नाट्यसंस्था, कलाकार आणि नाट्यरसिकांची मोठी गैरसोय झाली. डोंबिवलीच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला साजेसे नाट्यगृह पुन्हा उभे राहावे, अशी मागणी सातत्याने होत होती.

Metro Line 5: कल्याणनंतर आता उल्हासनगरलाही मेट्रो कनेक्टिव्हिटी; मेट्रो ५ चा विस्तार शांतीनगरपर्यंत, श्रीकांत शिंदेंनी दिली माहिती

पुनर्विकासासाठी पाठपुरावा

या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा केला, प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिक अडचणीमुळे कामे रखडू नयेत, यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे सातत्याने मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर आता उर्वरित कामांसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. ४ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण १०० टक्के खर्च राज्य शासनाकडून केला जाणार असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पुनर्विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा

नाट्यगृहाच्या पुनर्विकासानंतर डोंबिवलीच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. नाट्धप्रयोगांसाठी दर्जेदार रंगमंद, संगीत कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा आणि विविध कलाविष्कारांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक कलाकारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः डोंबिवलीतील नाट्यसंस्था, हौशी कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना पुन्हा एकदा हक्काचे व्यासपीठ मिळू शकणार आहे. केवळ नाट्यगृहाची इमारत उभी राहणे एवढ्यापुरताच हा प्रकल्प मर्यादित नसून, डोबिवलीची सास्कृतिक ओळख पुन्हा अधोरेखित करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरणार आहे, निधी मंजूर झाल्याने पुनर्विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा असून, उर्वरित कामे पूर्ण होऊन नाट्यगृह प्रत्यक्षात सुरू होण्याची प्रतीक्षा आता डोंबिवलीकरांना लागली आहे.

Pradeep Purnekar Case : ज्यांच्यावर आरोप झाले, त्याच मिनाक्षी शिंदेंनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लिहिलं पत्र!

नव्या नाट्यगृहात काय असणार?

पुनर्विकसित सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.

नाट्यप्रयोगांसाठी भव्य आणि आधुनिक रंगमंच.

प्रेक्षकांसाठी उत्तम आसनव्यवस्था..

आधुनिक प्रकाशयोजना आणि आकर्षक अंतर्गत सजावट.

छोटेखानी नाटवप्रयोगांसाठी स्वतंत्र ड्रामा थिएटर.

कलाकारांच्या सरावासाठी स्वतंत्र सराव कक्ष.

चित्रकला व अन्य कलाप्रदर्शनासाठी स्वतंत्र आर्ट गॅलरी.

नाट्यगृहाच्या बाह्य परिसराचा आणि अंतर्गत भागाचा विकास.

या सुविधांमुळे सावित्रीबाई फुले नाट्यगृह केवळ नाटयप्रयोगांचे सभागृह न राहता डोंबिवलीतील सर्वसमावेशक सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी किती निधी मंजूर झाला आहे?

    Ans: नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

  • Que: सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी कोणी पाठपुरावा केला?

    Ans: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला.

  • Que: नाट्यगृहाच्या पुनर्विकासामुळे डोंबिवलीकरांना काय फायदा होणार आहे?

    Ans: नाट्यप्रयोग, संगीत मैफली, कलाप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी डोंबिवलीकरांना आधुनिक सुविधांनी सज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Web Title: Dombivli news dombivli theatre redevelopment 45 crore budget pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Dombivli News
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Ulhasnagar News: सुभाष टेकडी परिसरात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; उलट्या, जुलाबाच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीती
1

Ulhasnagar News: सुभाष टेकडी परिसरात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; उलट्या, जुलाबाच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीती

Pradeep Purnekar Case : ज्यांच्यावर आरोप झाले, त्याच मिनाक्षी शिंदेंनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लिहिलं पत्र!
2

Pradeep Purnekar Case : ज्यांच्यावर आरोप झाले, त्याच मिनाक्षी शिंदेंनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लिहिलं पत्र!

Thane Unauthorized Stalls : ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगरसेविका आक्रमक; अनधिकृत टपऱ्या, रिक्षा आणि बेवारस वाहनांवर कारवाई
3

Thane Unauthorized Stalls : ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगरसेविका आक्रमक; अनधिकृत टपऱ्या, रिक्षा आणि बेवारस वाहनांवर कारवाई

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
4

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.