Crime News: वडगावमध्ये अमली पदार्थांची खुलेआम विक्री; तरुणाई अडकली ड्रग्जच्या विळख्यात
वडगाव परिसरातील, कुडे वाडा मातोश्री चौक सरदार महादजी शिंदे उद्यान परिसर,दिग्विजय कॉलनी,चौक, तळेगाव-वडगाव फाटा, ढोरे वाडा- केशवनगर परिसर, महामार्गावर लगत पान टपऱ्या आदी परिसरात खुलेआम अमली पदार्थांची विक्री होत असल्यामुळे स्थानिक शाळकरी, कॉलेज युवक, कष्टकरी युवक मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत.
विक्री करणारे विक्री करतात परंतु खरेदी करणारा स्थानिक युवक नशाप्राशन करण्यासाठी उघड्यावर दिवसा कोणाला न जुमानता, न घाबरता नशा करताना दिसुन येत आहेत. मात्र या साऱ्या प्रकाराकडे वडगाव मावळ पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अंमली पदार्थाचे आहारी तरूण पिढी मोठ्या प्रमाणात गेल्याचे जाणवत आहे. गुटखा MD व गांजा, दारू व इतर अंमली पदार्थ विक्रीचे काम छुप्या मार्गाने होत आहे.अंमली पदार्थ MD ड्रग्स, गांजा व गुटखा, दारू, ताडी यांसारखे अन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व ते त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली