Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध उत्खनन प्रकरणी १४ लाख रुपयांची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश गायकवाड निलंबित, तर निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 15, 2026 | 03:03 PM
छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर हादरले!
  • पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…;
  • धक्कादायक प्रकार समोर
Chhatrapati Sambhajinagar Police Bribery Video: राज्यातील कारभाराच्या केंद्रस्थानी असलेल्या मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता छत्रपती संभाजीनगर पोलिस दलावर गंभीर आरोप झाले आहेत. १४ लाख रुपयांची लाच घेतल्याचा दावा असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, संबंधित पोलिस निरीक्षकाची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती कारमध्ये बसून रोख रक्कम मोजताना स्पष्टपणे दिसतात. बॅगेमध्ये दोन, तीन, चार, पाच आणि सात लाख अशा टप्प्यांत पैसे मोजून ठेवले जात असल्याचे दृश्य आहे. सुरुवातीला १३ लाख रुपये मोजून बॅगेत ठेवण्यात येतात. त्यानंतर गणेश गायकवाड नावाचा व्यक्ती आणखी एक लाख रुपयांची मागणी करतो. आम्हाला १५-१५ द्यावे लागतात, हे पैसे पुढे वाटावे लागणार आहेत, असे संभाषण व्हिडीओमध्ये ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या संभाषणात एकदा पोलिस आयुक्तांच नाव देखील घेतल्या गेल्याचे व्हिडीओतून ऐकू येत असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. हा संपूर्ण व्यवहार अवैध उत्खननावर होणारी कारवाई टाळण्यासाठी असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

कर्मचाऱ्याचे निलंबन, निरीक्षकाची बदली

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक टप्यात विडीओमध्ये दिसणाऱ्या कर्मचारी गणेश गायकवाड याला निलंबित करण्यात आले असून, संबंधित पोलिस निरीक्षकाची बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

निरीक्षकाच्या नावाने झाला व्यवहार

या प्रकरणात पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या नावाने १२ लाख रुपये आणि रक्कम स्वीकारणाऱ्या या कर्मचाऱ्यासाठी दोन लाख रुपये असा व्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार बेगमपुरा पोलिस ठाणे हद्दीत घडल्याचे समोर आले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

लेणी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध उत्खननावर पोलिस कारवाई होऊ नये, यासाठी १४ लाख रुपयांची लाच घेतल्याचा दावा असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कारमध्ये बसून रोख रक्कम मोजली जात असल्याचे दिसते. पोलिस निरीक्षकाच्या नावाने मोठी रक्कम गोळा करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा धोक्यात आली आहे.

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली

Web Title: Chhatrapati sambhaji nagar police bribery 14 lakh video viral action taken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
1

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…
2

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
3

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…
4

दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.