Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधडी बिट परिसरातील मौजे डोंगरगाव येथे हातभट्टी दारू अड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2026 | 02:39 PM
Police action against Hatbhatti liquor den in Kinwat Nanded Crime News

Police action against Hatbhatti liquor den in Kinwat Nanded Crime News

Follow Us
Follow Us:

Crime News : किनवट : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई (Nanded News) करत मोठ्या प्रमाणावर मोहफुलापासून तयार केलेले रसायनयुक्त द्रव्य जप्त करून नष्ट केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Crime News)

किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधडी बिट परिसरातील मौजे डोंगरगाव येथे काही दिवसांपासून हातभट्टी दारू तयार करून तिची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून मासरेड मोहिम राबविण्यात आली.  दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास पो.हे. कॉ. प्रदीप आत्राम, बीट जमादार सिद्धार्थ वाघमारे, पो. कॉ. संजय राजने तसेच महिला पो. कॉ. मंजू पवार यांच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन संशयित ठिकाणी अचानक छापा टाकला.

हे देखील वाचा : टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका

दुर्गंधीयुक्त द्रव्य केले नष्ट

छाप्यादरम्यान आरोपी मोतीराम नागोराव हुरदुके (वय ४५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. डोंगरगाव ता. किनवट) हा इसम आपल्या शेतातील घराच्या अंगणात हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन साठवून ठेवताना आढळून आला. पोलिसांनी तपासणी केली असता तीन निळ्या रंगाच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये प्रत्येकी सुमारे २०० लिटर क्षमतेचे मोहफुलाचे फसफसते, आंबट व उग्र वासाचे रसायनयुक्त द्रव्य आढळून आले. एकूण सुमारे ६०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. त्यापैकी १८० मिली क्षमतेच्या बाटलीमध्ये नमुना पंचासमक्ष सील करून रासायनिक विश्लेषणासाठी जप्त करण्यात आला. उर्वरित नाशवंत व दुर्गंधीयुक्त द्रव्य पंचनामा करून जागीच नष्ट करण्यात आले.

कारवाईत सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पो. कॉ. संजय रांजणे यांच्या फिर्यादीवरून हाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सिद्धार्थ वाधमारे करीत आहेत. दरम्यान, किनवट पोलिसांनी अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेमुळे अशा बेकायदेशीर धंद्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

हे देखील वाचा : रामप्रहरी महापौर उतरल्या रस्त्यावर; नागरिकांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी

Web Title: Police action against hatbhatti liquor den in kinwat nanded crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • crime news
  • Nanded City Police
  • nanded news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
1

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!
4

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.