attack
जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पर्यटकांच्या एका समूहावर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हे पोलिस गणवेश परिधान करून आले. आधी त्यांनी पर्यटकांची नावे विचारली, त्यांचे ओळख पत्र तपासली त्यांनतर ते मुस्लिम नसल्याचे समाजाताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवादी हे भारतीय पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. मात्र या हल्ल्यानंतर परिसरामध्ये भीतीच वातावरण पसरलं होत. एक महिला भारतीय सैन्याला पाहून घाबरली. ती महिला भारतीय सैन्यांना पाहताच मोठं- मोठ्याने रडू लागली. यावरती सैनिकांनी तिला विश्वास दिला आणि त्या सर्व पर्यटकांना पाणी देत त्यांच्याकडून माहिती घेतली. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावरती व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ मध्ये काय म्हणत आहे महिला?
या व्हिडिओमध्ये एक पर्यटक काय घडलं हे सांगतांना दिसत आहे. तर त्यांच्या मागे बाजूला एक महिला मोठं- मोठ्याने रडतांना दिसत आहे. जेव्हा त्या महिलेची नजर भारतीय सैन्यावर पडते, तेव्हा ती महिला जोरात ओरडायला लागते आणि रडू लागते. सैनिक त्या घाबरलेल्या पर्यटकांना “खाली बसा आम्ही भारतीय सैनिक आहोत, तुमच्या सुरक्षेसाठी आहोत. तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही भारतीय सैनिक आहोत. खाली बसा. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कोणत्या ठिकाणावरून आला आहात असंही सैनिकांनी त्यांना विचारलं” मात्र त्यावेळी ती महिला माझ्या नवऱ्याला मारलं म्हणत पुन्हा मोठ्याने रडायला लागते. माझ्या नवऱ्याला मारलं, आता मला पण मारून टाका, असंही ती म्हणते.
महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू
या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात एकूण ६ महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी, यांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला आहे. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हे या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले आहेत.