
Palghar Crime: प्रियकराच्या घरी गेली अन् परतलीच नाही! १७ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय
अल्पवयीन मुलगी सापडली प्रियकराच्या घरी
सुत्रांच्या माहीतीनुसार ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ही अल्पवयीन मुलगी पालघर जिल्ह्यातील एका ठिकाणी राहणाऱ्या तिच्या प्रियकराच्या घरी गेली होती. त्याच ठिकाणी असताना अचानक तिची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ती घराबाहेर गेली असता तिचा पाय घसरून ती जोरात डोक्यावर खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दुखापत झाल्यानंतर मुलीला तेथे उपस्थित असलेल्य नागरीकांनी तातडीने कासा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी सुरु केली, पण रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाल्याने तिला मृत घोषित करण्यात आले.
दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या
कुटुंबीयांचा संशय घातपात की अपघात
मात्र, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, मुलीचा मृत्यू केवळ पाय घसरून झालेल्या अपघातामुळे झाला नसून या घटनेमागे काहीतरी वेगळे कारण असावे, असा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. तसेच मुलगी प्रियकराच्या घरी का गेली होती, तिची प्रकृती नेमकी कोणत्या कारणामुळे बिघडली, त्यानंतर ती पहाटे घराबाहेर कशी पडली आणि तिच्या डोक्याला झालेली दुखापत नेमकी कशामुळे झाली, यासह विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Delhi Crime: मुस्कान हत्या प्रकरणात मोठे वळण; CCTV फुटेजमुळे तपासाला वेग
कासा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद
कासा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याबरोबरच घटनेची माहिती आणि परिस्थितीची पडताळणी केली जात आहे. मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी आणि अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या तपासातून या घटनेमागे अपघात आहे की अन्य काही कारण, हे स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.