विद्यार्थिनी ६ महिन्यांची गर्भवती
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे शहर पोलिसांच्या हद्दीत मोडणाऱ्या गावात अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याच अत्याचारातून पीडित मुलगी 6 महिन्यांची गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले आहे.
पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी विधीसंघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचार, विनयभंग, छेडछाड अशा अनेक घटना वाढल्या आहेत. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गेल्या वर्षभरापासून आरोपीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली होती. या कालावधीत अल्पवयीन मुलाने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
हेदेखील वाचा : निक्की हत्याकांड प्रकरणात नवीन खुलासा, घटनेच्या वेळी विपिन घरी नव्हता का? व्हायरल व्हिडिओमुळे हत्येचे गूढ गुंतागुंतीचे
अखेर त्यातून पीडिता गरोदर राहिली. शरीरात जाणवलेले बदल आणि वैद्यकीय अस्वस्थता आईच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला.
भंडारा येथे यापूर्वी घडली घटना
काही दिवसांपूर्वीच भंडाऱ्यात एक संतापजनक घटना घडली. बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मावस भावाकडून अत्याचार व मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी मिळाल्यामुळे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्याआधी तिने सुसाईड नोट लिहून ठेवले. सुसाईड करण्याआधी तिने आरोपींची नावे लिहून त्यांना तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरवले आहे. त्यानंतर आता हा अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे.
महिलेवर अत्याचार
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या देऊळगाव येथे एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. पोलीस असल्याची बतावणी करत आरोपीने एका महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.