Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

खराडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट सातने बेड्या ठोकल्या आहेत. त्याला येरवडा येथील भोसलेवस्ती परिसरातून पकडण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 05:50 PM
मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले

Follow Us
Close
Follow Us:
  • मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
  • पोलिसांनी सापळा रचून पकडले
  • गुन्हे शाखेच्या युनिट सातची कारवाई
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खराडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट सातने बेड्या ठोकल्या आहेत. त्याला येरवडा येथील भोसलेवस्ती परिसरातून पकडण्यात आले आहे.

 

विनीत राजु देवकर (वय ३०, रा. वडारवस्ती, येरवडा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे व त्यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहरात होळी तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने शहरात गुन्हेगारांच्या झडतीसंदंर्भाने विशेष मोहिम राबविली होती. गुन्हे शाखा सातकडून कारवाई सुरू असताना खराडी पोलिस ठाण्यात धमकावणे तसेच इतर कलमान्वये दाखल गुन्ह्यात मोक्का कारवाई केली होती. त्या कारवाईतील आरोपी विनीत देवकर हा येरवडा परिसरातील भोसलेवस्ती येथे आलेला असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार, पथकाने येरवडा परिसरातील भोसलेवस्ती भागात सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : 15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

गेल्या काही दिवसाखाली गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील फरार असलेला मोक्का गुन्ह्यातील एका आरोपी अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा. छ. संभाजीनगर) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून पकडले आहे. गँगस्टर निलेश घायवळ देखील परदेशात पळाला असून, अद्याप पोलिसाना त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे तसेच उपनिरक्षक संजय नरळे, पोलिस अंमलदार अमोल सुतकर तसेच त्यांच्या पथकाने केली आहे. पुणे शहरातील पाहिजे व फरार असलेल्या आरोपींची माहिती काढून त्यांना जेरबंद केले जात आहेत. दरम्यान, वारजे माळवाडी पोलिस त्यांच्याकडे असलेल्या मोक्कातील पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना उपनिरीक्षक संजय नरळे यांना अमोल लाखे याच्याबाबत माहिती मिळाली. तो बार्शी शहरात राहत असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्याने गुन्ह्यातील सहभाग मान्य केला.

Web Title: Pune police has arrested the absconding accused in the mokka crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला
1

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…
2

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना
4

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.