Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल करत…

मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३० मे रोजी मोहोळ वैराग रस्त्यावर येथील एकाला तिघांनी दुचाकीवर येऊन कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करून हातातील अंगठी व खिशातील रोख रक्कम काढून घेतल्याची घटना घडली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2025 | 09:07 AM
कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल करत...

कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल करत...

Follow Us
Close
Follow Us:

मोहोळ : मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धमकावून, कोयत्याचा धाक दाखवून झालेल्या जबरी चोरीसह तीन गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह अन्य दोन महिला व सहा पुरुषांवर मोहोळ पोलीस ठाण्यात तीन प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करत पोलीस कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३० मे रोजी मोहोळ वैराग रस्त्यावर येथील एकाला तिघांनी दुचाकीवर येऊन कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करून हातातील अंगठी व खिशातील रोख रक्कम काढून घेतल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता. मोहोळ शहर व परिसरातील सीसीटीव्ही तपासून त्यामधील संशयित आरोपींची ओळख पटवून गोपनीय बातमीदारांच्या मदतीने त्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ धोंडीराम कोरे, राज मनोज पवार व एक विधी संघर्ष बालक (तिघेही रा. पंढरपूर) यांना अटक करण्यात आली.

तसेच ३ जून रोजी शेटफळ चौकामध्ये माळशिरस तालुक्यातील मेंढपाळांच्या कळपातील मेंढ्या चोरी प्रकरण पोलिसांनी तपास करत संशयित आरोपींची माहिती मिळवीत त्या गुन्ह्यात सुनील विजय भोसले (रा. संघदरी, ता. दक्षिण सोलापूर), करण दत्तात्रय गायकवाड (रा. दहिवडी ता. तुळजापूर) व लक्ष्मण राजकुमार काळे (रा. पाटकुल ता. मोहोळ) यांना अटक करून चोरीला गेलेली मेंढरे हस्तगत केली.

तसेच मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळ्यांच्या चोरी प्रकरणातही हेच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये आनंद सतीश शिंदे (रा. डोराळे ता. वैराग) हा फरार असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

यातील तिसऱ्या घटनेमध्ये बिटले (ता. मोहोळ) येथील यल्लमा देवीच्या यात्रेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला असता गोपनीय बातमीदाराच्या मदतीने माहिती घेऊन पाथरूड (ता. भूम जि. धाराशिव) येथील ननिता यासीनखान भोसले व सुनिता नानासाहेब पंडित या दोघींना अटक करून पुण्यात गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर यांच्यासह इतर पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Police take strict action against those who commit theft by threatening to kill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • Police Action
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त
1

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश
2

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही
3

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं
4

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.