अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय २५, रा. पालकरवाडा मंगळवारपेठ, कराड) व ओमकार दीपक जाधव (वय २२, रा. होली फॅमिली स्कूलजवळ, विद्यानगर, सैदापूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेसवर निलजी बामणी येथे एकजण बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली.
तीन पानटप्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात…
मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३० मे रोजी मोहोळ वैराग रस्त्यावर येथील एकाला तिघांनी दुचाकीवर येऊन कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करून हातातील अंगठी व खिशातील रोख रक्कम काढून घेतल्याची…
आठ मेडिकलचे शटर उचकटून प्रत्येक मेडिकल मधील रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेतील चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.
शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तासगाव शहरातील एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित रजनीकांत भाऊसाहेब देवकुळे (वय ४३) याच्याविरोधात तासगाव पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
परळी शहरातील धूम स्टाईल वाहने चालवणाऱ्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वारंवार नागरिकांनी मागणी करूनही पोलीस कुठलीही कारवाई या वाहनचालकांवर करत नसल्याचा आरोप परळीकर करत होते.