Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! सेवेतून बडतर्फीची नोटीस मिळताच पोलिसाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

मंगळवारी सायंकाळी त्यांनी ड्युटीवर असताना स्ट्राँग रूममध्येच विष प्राशन केले. प्रकृती खालावल्याने त्यांनी फोन करून कुटुंबीय आणि नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांसह कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 30, 2025 | 03:01 PM
लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य

लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस मिळाल्याने तणावात असलेल्या पोलिसाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना कळमनाच्या स्ट्राँग रूम परिसरात घडली. या घटनेने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. रामचंद्र नानाजी रोहणकर (वय 54, रा. अंजनी सोसायटी, पिपळा फाटा) असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हेदेखील वाचा : कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी; अनेकांचा मृत्यू, जखमींची संख्याही जास्तच; पंतप्रधानांचा योगी आदित्यनाथ यांना फोन

मिळालेल्या माहितीनुसार, रोहणकर शहर पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांची तैनाती पोलिस मुख्यालयात होती. गतवर्षी एप्रिल महिन्यात रोहणकर आणि त्यांचा सहकारी हवालदार भूषण बेलखोडे हे दोघेही पिपळा फाटाजवळील निमजे सावजी भोजनालयात जेवण करण्यासाठी गेले होते. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांचा भोजनालयाच्या मालकाशी वाद झाला होता. या दरम्यान त्यांनी मालकाला शिविगाळ करून मारहाण केली होती. ही संपूर्ण घटना भोजनालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

तसेच हॉटेलच्या कर्मचाऱ्याने दोघांचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. घटनेच्या वेळी आसपासचे नागरिकही मोठ्या संख्येने तेथे जमले होते. नागरिकांनी रोहणकर आणि बेलखोडेला पकडून चांगला चोप दिला.

पोलिसांची प्रतिमा झाली होती मलीन

काही दिवसांपूर्वीच दोघेही परत सेवेत रुजू झाले. त्यांची ड्यूटी कळमनाच्या ईव्हीएम स्ट्रॉग रूममध्ये लावण्यात आली होती. दोघांच्याही कृत्याने नागरिकांच्या मनात पोलिस विभागाची प्रतीमा मलीन झाली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच दोघांनाही सेवेतून बडतर्फ का करू नये, अशी नोटीस बजावून उत्तर मागण्यात आले होते. नोटीस मिळाल्याने रोहणकर यांना नोकरी जाण्याची भीती होती. त्यामुळे ते तणावात होते.

स्ट्राँग रूममध्येच विष प्राशन

मंगळवारी सायंकाळी त्यांनी ड्युटीवर असताना स्ट्राँग रूममध्येच विष प्राशन केले. प्रकृती खालावल्याने त्यांनी फोन करून कुटुंबीय आणि नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांसह कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले. रोहणकर यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी दोघांविरुद्धही गुन्हा नोंदविला होता. त्याच दरम्यान त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

कुटुंबीय मृतदेह घेऊन मूळगावी रवाना

कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रोहणकर यांनी आत्महत्या केली की प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला हे उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. रोहणकर यांची पत्नी सुनिता ही गृहिणी आहे. त्यांचा मुलगा मिथिलेश हा पोलिस भरतीची तयारी करीत आहे, तर मुलगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

हेदेखील वाचा : Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता…

Web Title: Policeman commits suicide after receiving notice of dismissal from service nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Nagpur Crime News

संबंधित बातम्या

Nagpur Crime :नागपुरात खळबळ! रस्ते खोदकामादरम्यान सापडले 4 मानवी सांगाडे
1

Nagpur Crime :नागपुरात खळबळ! रस्ते खोदकामादरम्यान सापडले 4 मानवी सांगाडे

नागपुरात सफाई कामगाराची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये…
2

नागपुरात सफाई कामगाराची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये…

MBBS चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, पोलिसांना माहिती मिळताच…
3

MBBS चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, पोलिसांना माहिती मिळताच…

Nagpur Crime : हल्दीराम समूहाला 9 कोटींचा गंडा; बनावट स्टॉक आणि कागदपत्रे दाखवून….
4

Nagpur Crime : हल्दीराम समूहाला 9 कोटींचा गंडा; बनावट स्टॉक आणि कागदपत्रे दाखवून….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.