मोहोळला तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू १५ जण जखमी; कंटेनरचालाकाने केले पलायन; गुन्हा दाखल
संतोष नागनाथ भिसे (वय २५, रा. मार्वेâटयार्ड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर, कृष्णा लक्ष्मण ससाणे असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबवेवाडी येथील पुष्प मंगल कार्यालयासमोर बुधवारी (दि.२५) पहाटे ही घटना घडली. संतोष भिसे आणि कृष्णा ससाणे हे दोघे मित्र आहेत. बुधवारी रात्री दुचाकीवरून ते घरी निघाले होते.संतोष भिसे हा दुचाकी चालवित होता.
पुष्प मंगल कार्यालयासमोर भिसे याने राँग साईडने जात एका कारला धडक दिली. या अपघातात मागे बसलेला कृष्णाला मार बसला. त्याला उपचाराची गरज होती. मात्र, त्याने कोणालाही न कळविता चिंतामणी देशमुख उर्दू शाळेच्या मोकळ्या मैदानात कृष्णाला ठेवून निघून गेला. दुसर्या दिवशी सकाळी पोलिसांना मैदानात मृतदेह मिळाला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याचे दिसून आले. त्याचा तपास केल्यानंतर मैदानात जो मृतदेह सापडला, ती व्यक्ती या अपघातात असल्याचे दिसून आले. ससाणे याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे मोटारसायकलचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक अशोक येवले पुढील तपास करीत आहेत.
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचारी महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचाऱ्यांकडील मोबाइल संच चोरून नेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशातचं आता पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; बाणेरमध्ये पादचारी महिलेचे मंगळसूत्र चोरले
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या गुरुवारी (२६ डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास बाणेर परिसरातून निघाल्या होत्या. काॅर्नर स्टोन इमारतीजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक थिटे अधिक तपास करत आहेत. पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यांसोबतच गर्दीत, प्रवासात तसेच एकट्या पादचारी जाणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष केले आहे. संधी साधून चोरटे दागिने चोरून पसार होत आहेत. मात्र, या टोळ्यांचा तसेच चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.