Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांवर थेट तडीपारीची कारवाई

पुणे शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहशत माजविणाऱ्या नऊ गुंडाना एकाचवेळी शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 01:35 PM
पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांवर थेट तडीपारीची कारवाई

पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांवर थेट तडीपारीची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका!
  • 9 गुंडांवर थेट तडीपारीची कारवाई
  • गुंडांवर गंभीर गुन्हे दाखल
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहशत माजविणाऱ्या नऊ गुंडाना एकाचवेळी शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या तडीपारीचे आदेश
परिमंडळ दोनचे उपायुक्त मिलींद मोहिते यांनी दिले आहेत.

 

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने तडीपारी कारवाई करण्यात आल्याने सराइतांना जरब बसली आहे. जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय २६, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय २३, रा. बिबवेवाडी), राजु महादेव डेंगळे (वय २२, रा. सुखसागर नगर), आकाश गुलाबराव कांबळे (वय २१, रा.), कृष्णा बबन लोखंडे (वय २४, रा.), आर्यन बापु बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक), सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड), साहिल भिमा अष्टगे (वय २०, रा. मार्केटयार्ड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुणे शहरात वाढती गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाला लगाम लावण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचललेली आहेत. गुन्हेगारी टोळ्या, तसेच सराइतांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. दरम्यान, अधून-मधून घडणाऱ्या घटनांमुळे दहशत पसरत आहे. तसेच, नागरिक देखील भयभीत आहेत. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचत आहे. या पार्श्वभूमीवर नऊ जणांना तडीपार करण्यात आले आहे.

आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा : पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद; दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने तरुणाला प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भवानी पेठेतील कासेवाडी भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. अमन सुभाष मोरे (वय २६, सध्या रा. दत्तवाडी, मूळ रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अल्तमश नासीर शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याला अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pune police has taken direct action against several goons to prevent crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल
1

Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला; केतन अग्रवालचा ‘तो’ शेवटचा रोमँटिक Video व्हायरल

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?
2

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी
3

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी

Pune Crime: गुगलवर हत्येची माहिती शोधली, कॅफेत कट रचला? केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा
4

Pune Crime: गुगलवर हत्येची माहिती शोधली, कॅफेत कट रचला? केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.