Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील फरार असलेला मोक्का गुन्ह्यातील एका आरोपी अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा. छ. संभाजीनगर) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2026 | 12:30 AM
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; 'या' भागात सापळा रचून पकडले

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; 'या' भागात सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:
  • निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
  • पोलिसांनी सापळा रचून पकडले
  • गँगस्टर निलेश घायवळ अजूनही फरार
पुणे : गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील फरार असलेला मोक्का गुन्ह्यातील एका आरोपी अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा. छ. संभाजीनगर) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून पकडले आहे. गँगस्टर निलेश घायवळ देखील परदेशात पळाला असून, अद्याप पोलिसाना त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

 

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे तसेच उपनिरक्षक संजय
नरळे, पोलिस अंमलदार अमोल सुतकर तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहरातील पाहिजे व फरार असलेल्या आरोपींची माहिती काढून त्यांना जेरबंद केले जात आहेत. दरम्यान, वारजे माळवाडी पोलिस त्यांच्याकडे असलेल्या मोक्कातील पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना उपनिरीक्षक संजय नरळे यांना अमोल लाखे याच्याबाबत माहिती मिळाली. तो बार्शी शहरात राहत असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्याने गुन्ह्यातील सहभाग मान्य केला.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! लग्नानंतर तीन महिन्यातच छळ; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

निलेश घायवळ टोळीचा इतिहास

कोथरूडच्या गर्द हिरवाईत, शिक्षणसंस्था आणि ‘उच्चभ्रू’ वसाहतींच्या शांत कुशीत गुन्हेगारीचे रोप कसे रुजले ? असा प्रश्न गजा मारणे टोळीच्या उदयानंतर समोर येतो. पण, याच उच्चभ्रू व उच्चशिक्षीत तसेच जिथून विद्-वत्ता घडावी अशा परिसरातून उच्चशिक्षण घेणारा निलेश घायवळ नावाचा तरूण गुन्हेगारीकडे वळला आणि त्याची दुसरी टोळी तयार झाली. फक्त, कोथरूड, पुणे शहर मर्यादित न राहता त्याच्या टोळीचे हात जामखेड, धाराशिव, पौड, मुळशी, अहमदनगर अशा भागांमध्ये पसरले. निलेश घायवळला गुन्हेगारीत ‘बॉस’ नावाने ओळखले जाते. एकाच भागातील असल्याने गजानन मारणे, रूपेश मारणे व संतोष शेलार यांच्याशी त्याची मैत्री होती. पण, त्यांच्यासोबतच तो १९९९ पासून गुन्हेगारीत शिरला. दोन खूनाच्या गुन्ह्यात निलेशचा प्रत्यक्ष सहभाग होता. एकाच टोळीचा भाग असलेले गजा मारणे व निलेश यांच्यात वर्चस्व, मनात असलेला मी पणा, आर्थिक उलाढाल, पैसा आणि इतर कारणांनी या दोघांत वाद झाले आणि एकाच भागात दोन टोळ्या निर्माण झाल्या.

Web Title: Warje malwadi police have arrested an accused from the nilesh ghaywal gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News: नवी मुंबई हादरली! सीवूड्समध्ये अज्ञात तरुणाच्या डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह
1

Crime News: नवी मुंबई हादरली! सीवूड्समध्ये अज्ञात तरुणाच्या डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Mahadev Betting App Case: टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची इडी करणार चाैकशी, अवैध सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
2

Mahadev Betting App Case: टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची इडी करणार चाैकशी, अवैध सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
3

व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Crime : मैत्रीचे नाते संपले रक्तरंजित शेवटाने; मुंब्र्यातील थरारक हत्येचा उलगडा
4

Mumbai Crime : मैत्रीचे नाते संपले रक्तरंजित शेवटाने; मुंब्र्यातील थरारक हत्येचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.