Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गर्भवतीचा मृत्यू; DM डुडी म्हणाले, “या प्रकरणात…”

आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.  दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2025 | 02:30 PM
दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गर्भवतीचा मृत्यू; DM डुडी म्हणाले, "या प्रकरणात कारवाई..."

दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गर्भवतीचा मृत्यू; DM डुडी म्हणाले, "या प्रकरणात कारवाई..."

Follow Us
Follow Us:

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखलकरून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. त्यामुळे महिला पिंपरी-चिंचवड शहरातील एका रुग्णालयात जाऊन दाखल झाली. त्याठिकाणी महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर आता पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर रूग्णालयाबाहेर आंदोलन केले जात आहे. ठाकरेंच्या सेनेचे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणावर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र डुडी म्हणाले, “रूग्णालयात घडलेल्या प्रकारची आम्ही माहिती घेतली आहे. त्यावर आम्ही उचित कारवाई करणार आहोत. भाडेतत्वावर कुणालाही जमीन देताना काही अटी असतात त्या अति शर्थी बघून निर्णय घेऊ. या प्रकरणात कडक कारवाई करणे आवश्यक आहे.”

त्यापुढे बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, ” नेमके काय घडले हे आता रिपोर्ट आल्यावरच कळेल. त्यानंतरच चूक कोणाची हे समजण्यास मदत होणार आहे. आम्ही दोन दिवसांत रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणात आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत.”

भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू

सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.  दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखलकरून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.

मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आडमुठी भूमिका; भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू

दरम्यान, गुरूवारी याबाबत आमदार अमित गोरखे यांनी माध्यमांशी संवाद साधत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या या कारभाराबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी अश्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या असल्याचे सांगितले. त्यांनी हा गंभीर गुन्हा केला असून, त्याबाबत अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असून, मुख्यमंत्र्यांना कडक कारवाईबाबत मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. हे रुग्णालय ट्रस्ट म्हणून गरिबांसाठी आहे. परंतु, त्यांच्याकडून असे होत आहे.

Web Title: Pune collector jitendra dudi said strict action against manegshkar hospital about pregnant women death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • crime news
  • Dinanath Mangeshkar Hospital
  • Pregnant woman
  • Pune

संबंधित बातम्या

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप
2

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
3

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

स्वारगेट एसटी स्थानकात दागिने चोरणाऱ्या महिलांना ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे दागिने जप्त
4

स्वारगेट एसटी स्थानकात दागिने चोरणाऱ्या महिलांना ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे दागिने जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.