Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manchar Crime: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण! पतसंस्थेला तब्बल ९.४१ लाखांचा गंडा

Manchar Crime: याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या महाळुंगे पडवळ शाखेत ८ जून २०२६ रोजी सचिन राधाकिसन मोरे (रा. नांदूर, ता. आंबेगाव) यांनी खाते उघडून पतसंस्थेचे सभासदत्व स्वीकारले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2026 | 07:50 PM
सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण; पतसंस्थेला 9.41 लाखांचा गंडा

सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण; पतसंस्थेला 9.41 लाखांचा गंडा

Follow Us
Follow Us:

सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण
पतसंस्थेला ९ लाख ४१ हजारांचा गंडा
मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Manchar Crime:  सोन्याचे दागिने असल्याचे भासवून प्रत्यक्षात चांदीचे दागिने तारण ठेवत एका पतसंस्थेकडून तब्बल ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अधिकारी राजेंद्र शिवराम गायकर (वय ६०, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या महाळुंगे पडवळ शाखेत ८ जून २०२६ रोजी सचिन राधाकिसन मोरे (रा. नांदूर, ता. आंबेगाव) यांनी खाते उघडून पतसंस्थेचे सभासदत्व स्वीकारले. त्याच दिवशी त्यांनी ३८ ग्रॅम ६०० मिली वजनाचे दागिने सोने तारण कर्जासाठी ठेवले. पतसंस्थेचे सोने मूल्यांकन करणारे कर्मचारी किरण सूर्यकांत दहीवाळ यांनी केलेल्या मूल्यांकनानुसार व्यवस्थापक योगेश गावडे यांनी ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचे कर्ज मंजूर करून ही रक्कम मोरे यांच्या बचत खात्यात जमा केली.
Amravati News: साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा
त्यानंतर १६ जून २०२६ रोजी मोरे यांनी पुन्हा ७६ ग्रॅम ९०० मिली वजनाचे दागिने तारण ठेवून ६ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. अशा प्रकारे दोन व्यवहारांत एकूण ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलले. दरम्यान, काही दिवसांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांबाबत मूल्यांकन करणारे कर्मचारी दहीवाळ यांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी दागिन्यांचे पुन्हा मूल्यांकन केले असता, त्यामध्ये केवळ २२.५७ टक्के सोने आणि ७७.२६ टक्के चांदी असल्याचे आढळून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय, मोरे यांनी दिलेल्या पत्त्यावर चौकशी केली असता नांदूर येथे या नावाची व्यक्ती राहत नसल्याचे समोर आले. तसेच कर्जासाठी सादर केलेली कागदपत्रेही खोटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण ठेवून खोटी कागदपत्रे सादर करत पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गायकर यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.
SBI ATM Fraud : ग्राहकासोबत ATM फ्रॉड, बँकच ठरली दोषी? नुकसानभरपाई देणार SBI; कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
💡

Frequently Asked Questions

  • Que: मंचरमध्ये पतसंस्थेची कितीची फसवणूक करण्यात आली आहे?

    Ans: मंचरमध्ये पतसंस्थेची ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • Que: फसवणूक कशाप्रकारे करण्यात आली?

    Ans: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण ठेवून खोटी कागदपत्रे सादर करत फसवणूक केली गेली.

Web Title: Bank defrauded 9 lakh rupees pledging of silver ornaments instead of gold jwellery in manchar crime tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Bank Fraud
  • crime news
  • Manchar

संबंधित बातम्या

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू
1

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

Harry Boxer Arrested: रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा गँगस्टर हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद!
2

Harry Boxer Arrested: रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा गँगस्टर हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद!

पद गेलं अन् नशिबी थेट नजर कैद! Santiago Pena यांच्यासोबत घडलं काय? निवासस्थानाभोवती कडेकोट…
3

पद गेलं अन् नशिबी थेट नजर कैद! Santiago Pena यांच्यासोबत घडलं काय? निवासस्थानाभोवती कडेकोट…

Paraguay News : पॅराग्वेमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना यांच्या महाभियोगाची सिनेटमध्ये सुनावणी सुरू
4

Paraguay News : पॅराग्वेमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना यांच्या महाभियोगाची सिनेटमध्ये सुनावणी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.