Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: भटक्या श्वानावरून वाद; पुण्यात दाम्पत्यावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला

Pune Crime दुचाकीस्वार तरुणाला दोघांनी अडवले. ‘श्वानावरुन आमच्या घरातील महिलांना मारहाण का केली?’, अशी विचारणा आरोपींनी केली. आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तरुण आणि त्याची पत्नी जीव वाचविण्यासाठी तेथून पळाले.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 24, 2026 | 04:55 PM
Pune Crime, Navi Mumbai, Ambegaon Police, Firing Case

Pune Crime, Navi Mumbai, Ambegaon Police, Firing Case

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील मुंढवा येथील केशवनगर परिसरात भटक्या श्वानावरून झाला वाद.
  • तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात निघालेल्या दाम्पत्याला वाटेत अडवून हल्ला.
  • तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार, आरोपींकडून पाठलाग करून मारहाण.
Pune Crime News : भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याने झालेल्या वादातून दाम्पत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत चैतन्य अतुल वज्रमुष्ठी (वय ३१, रा. मोरया क्रिस्टल सोसायटी, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तक्रारदाराने भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याने आरोपींनी तक्रारदार तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुण आणि त्याची पत्नी याबाबतची तक्रार देण्यासाठी दुचाकीवरुन पोलीस ठाण्यात निघाले.

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे

दुचाकीस्वार तरुणाला दोघांनी अडवले. ‘श्वानावरुन आमच्या घरातील महिलांना मारहाण का केली?’, अशी विचारणा आरोपींनी केली. आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तरुण आणि त्याची पत्नी जीव वाचविण्यासाठी तेथून पळाले. आरोपींनी तरुणाचा पाठलाग करुन मारहाण केली. तरुणाच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी तिला मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

धनकवडीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न

पुणे, वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना धनकवडीतील गुलाबनगर परिसरात घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. निशांत मुकुंद पिसे (वय ४६, रा. सुवर्णा हाईट्स, तळजाई पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी समाधान प्रभू पवार (वय ४२, रा. नवजीवन मित्र मंडळ, आंबेगाव पठार, धनकवडी ) याला अटक करण्यात आली. याबाबत मुकुंद पिसे (वय ७८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Taloja Firing Case: तळोजा गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी पुण्यातून ताब्यात; आंबेगाव पोलिसांची कारवाई

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंद पिसे हे वकील आहेत. त्यांचा मुलगा निशांत यांचा आरोपी समाधान याच्याशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. आराेपीचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. २२ ऑक्टोबर रोजी निशांत हा धनकवडीतील गुलाबनगर परिसरातून निघाला होता. आरोपीने निशांत यांच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात निशा्ंत गंभीर जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक मिठारे तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंढव्यात घडलेल्या मारहाणीच्या घटनेचे मुख्य कारण काय होते?

    Ans: भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्यावरून आरोपी आणि तक्रारदार यांच्यात वाद झाला होता.

  • Que: आरोपींनी दाम्पत्यावर कसा हल्ला केला?

    Ans: तक्रारदार तरुण आणि त्याची पत्नी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि पाठलाग करून मारहाण केली.

  • Que:  या प्रकरणी पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?

    Ans: मुंढवा पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Pune crime news stray dog fight sharp weapon attack as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 04:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.