Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर

टिळक रस्त्यावर मुलाखत देत असताना सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर अचानक हल्ला करणारा नेमका कोण? याचा खुलासा झाला आहे. पोलिस तपासात संशयिताची ओळख समोर आली असून, त्याचे गणेश मंडळाशी असलेले कनेक्शनही चर्चेत आले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 03, 2026 | 03:44 PM
Pune Crime News: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर

Pune Crime News: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Follow Us:
  •  बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताची ओळख समोर
  • संशयित हा कोथरूडमधील राऊतवाडीचा रहिवासी असल्याची माहिती
  • डीजेबंदीच्या भूमिकेचा राग की गणेशोत्सवाशी संबंधित वाद? तपास सुरू
Pune Vidyanand Bapat Attack: डीजेबंदी आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात संशयित आरोपीची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संतोष चव्हाण असे त्याचे नाव असून, तो कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. या प्रकरणात बापट यांची तक्रार आणि जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुलाखतीदरम्यान अचानक हल्ला

टिळक रस्त्यावर एका माध्यम संस्थेला मुलाखत देत असताना बापट यांच्यावर चव्हाण याने अचानक हल्ला केल्याचे सांगण्यात येते आहे. गणेशोत्सव आणि डीजेबंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. बापट यांच्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: Pune News: पुण्यात मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई; संतोष पंडितांना अटक, ‘हीच आमची लायकी’ म्हणत मोबाईल-बेल्ट कुटुंबीयांकडे दिला

गणेश मंडळाशी संबंधित असल्याची माहिती

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संतोष चव्हाण हा राऊतवाडी परिसरातील ‘प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष राहिला आहे. सध्या तो एका स्थानिक बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाशी त्याचा पूर्वीपासून संबंध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे नेमके कोणते कारण होते, हे अद्याप तपासातून स्पष्ट झालेले नाही. डीजेबंदीच्या भूमिकेचा राग, गणेशोत्सवाशी संबंधित एखादे वक्तव्य किंवा अन्य कोणता वैयक्तिक अथवा स्थानिक वाद यापैकी नेमके कारण कोणते, याचा तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा: Akola Crime News: अकोला कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा गैरव्यवहार; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ७ जणांवर गुन्हा दाखल,१३८ मूळ फाईल्स गहाळ

आणखी कोणाचा सहभाग?

हल्ला अचानक झाला की त्यामागे पूर्वनियोजित कारण होते, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी, उपलब्ध माहिती आणि बापट यांच्या जबाबाच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयिताने बापट यांच्याविरोधात आक्रमक वक्तव्य केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या वक्तव्यांची आणि हल्ल्यामागील कारणांची अधिकृत पडताळणी पोलिस तपासातून होणे बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील तपासानंतरच हल्ल्याचे नेमके कारण आणि इतर व्यक्तींचा सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Pune crime news who exactly assaulted vidyanand bapat shocking details revealed through police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 03:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.