Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: मैत्रीण धावली म्हणून वाचला जीव! पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न…

Pune Crime: पुण्याच्या कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे! १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला नागरिकांनी रंगेहात पकडत चांगलाच चोप दिला. मैत्रिणीच्या आणि नागरिकांच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला असून, या थरारक घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 26, 2026 | 12:38 PM
crime news

crime news

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात कात्रज-कोंढवा रोडवर १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न
  • मैत्रिणीच्या आणि नागरिकांच्या प्रसंगावधामुळे नराधम पकडला गेला
  • भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी जितु सरोजला घेतले ताब्यात
Pune Crime: पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. १८ वर्षीय करून तिला बळचईने उचलून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वेळीच जमा झालेल्या नागरिकांच्या आणि मैत्रिणीच्या प्रसंगावधामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांनी धाडस दाखवत आरोपीला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी सुखसागर परिसरातील समर्थ डेअरीसमोर आपल्या मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती. यादरम्यान, आरोपी तिथे आला आणि त्याने तरुणीची छेड काढत तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Kolhapur Crime News: चोरी केली, थार घेतली अन् चुलत्याकडूनच कौतुक करून घेतले! कोल्हापुरातील अजब चोरीचा पर्दाफाश

पीडित तरुणीने सांगितला थरारक अनुभव

या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देताना पीडित तरुणी म्हणाली, “मी शनिवारी साडेसहाच्या सुमारास सुखसागर परिसरातील समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबले होते. तेव्हा तो तिकडे आला, माझ्या शेजारून फिरला आणि मला डायरेक्ट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात माझी मैत्रीण तिकडे आली, तिने त्याला ढकललं, तेव्हा मी खाली पडले. पडल्यावर मला हाताला लागले. तरीही तो माझ्या मैत्रिणीला ढकलून मला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. नंतर तिथे लोक जमा झाले, त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांनाही मारायचा प्रयत्न करत होता. तो अनोळखी होता, मी त्याला कधीही पाहिले नव्हते. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझी मैत्रीण वेळेत आली म्हणून वाचले, नाहीतर तो मला उचलून घेऊन गेला असता.” 

हेही वाचा: Husband Murder Case: विषाचा प्रयोग ठरला अपयशी! घाबरलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने उरकली पतीची हत्या

नागरिकांचा रोष अन् पोलिसांनी केली कारवाई

तरुणीच्या आरडाओरडीनंतर तिची मैत्रीण आणि आजूबाजूचे स्थानिक नागरिक तात्काळ मदतीला धावून आले. नागरिकांनी नराधम आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. यावेळी आरोपीने एका व्यक्तीचा मोबाईलही जमिनीवर फेकून फोडला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी जितु सरोज याला तात्काळ ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पु्ण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Pune katraj kondhwa sukhsagarnagar girl kidnap attempt crime news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • pune crime case
  • Road Issue

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.