Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध 893 पानांचे दोषारोपपत्र दाखल

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणाचा तपास ५२ दिवसात पुर्ण करून पुणे पोलिसांनी तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 18, 2025 | 12:38 PM
स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध 893 पानांचे दोषारोपपत्र दाखल

स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध 893 पानांचे दोषारोपपत्र दाखल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणाचा तपास ५२ दिवसात पुर्ण करून पुणे पोलिसांनी तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तांत्रिक गोष्टींवर अत्यंत चांगल्या पद्धतीने हा तपास पुर्ण केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविला जाणार असून, तिही प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न पोलिसांचे आहेत.

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी गावी निघालेल्या २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) याने पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गावी जाण्यास आलेल्या तरुणीला गाडेने ताई म्हणून संवाद साधत तिचा विश्वास संपादन केला. नंतर तिला वाहक असल्याचे सांगत तिला मुक्कामी गाडीत बसण्यास भाग पाडले. तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला होता. बलात्काराच्या घटनेनंतर गाडे फरार झाला होता. तरुणीने देखील तक्रार देण्यास तीन ते चार तास उशिर केला होता. त्यामुळे आरोपी तोपर्यंत मुळ गावी पोहचला होता. तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीची ओळख पटवली होती. मात्र, त्याचा शोध घेण्यास ३ दिवसांचा कालावधी लागला होता. अथक शोध मोहिमेनंतर त्याला गुनाट गावातील शेतातून पकडण्यात आले होते.

पोलिसांनी याप्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पंचनामा, कपड्यांवर डाग तसेच दत्तात्रयचे शुज, कपडे जप्त केले होते. वैद्यकीय तपासणी, डीएनएची देखील तपासणी केली. त्यासोबतच घटना बसमधून आवाज बाहेर येतो किंवा नाही, याची शास्त्रोक्त पडताळणी तसेच फॉरेन्सिक अहवाल आणि इतर महत्त्वाच्या पुराव्यांवर आधारित तपास करण्यात आला. एकूण ८९३ पानी दोषारोपत्र तयार करत शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. मात्र, अद्यापही दत्तात्रय गाडेचा मोबाईल मात्र, पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

  • दत्तात्रय गाडे व तरुणीच्या केसांचा डीएनए मॅच
  • दत्तात्रय गाडेच्या शर्टचे तुटलेले अर्धे बटन सापडले
  • बसमधून तरुणीचा आवाज येतो का हेही तपासले
  • पिडीत तरुणीने आरोपीला ओळखले

Web Title: Pune police has filed a chargesheet against accused dattatray gade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • Datta Gade
  • Datta Gade Arrested
  • Pune Police Action
  • Swargate Case

संबंधित बातम्या

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले
1

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले

बिनधास्त बेकायदा पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांची वाघोलीत मोठी कारवाई
2

बिनधास्त बेकायदा पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांची वाघोलीत मोठी कारवाई

Investment Fraud : जादा परताव्याच्या आमिषाने दोघांची फसवणूक; लाखो रुपयांना घातला गंडा
3

Investment Fraud : जादा परताव्याच्या आमिषाने दोघांची फसवणूक; लाखो रुपयांना घातला गंडा

दहीहंडीनिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
4

दहीहंडीनिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.