मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र मुंबईला धडकणार असून, पुन्हा एकदा ताकद दाखवण्यासाठी मुंबईत या, असे आवाहन मराठा आंदाेलक मनोज जारंगे पाटील यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची राज्य सरकारच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध कायम असून, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
पोंबरेतील वानरमारे समाजाची वस्तुस्थिती ही लोकशाही व्यवस्थेच्या निर्घृण अपयशाचा मूर्तिमंत पुरावा ठरते. आरोग्यसेवा तर दूरच, आजपर्यंत कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याने त्यांच्या वस्तीकडे फिरकण्याचीही तसदी घेतलेली नाही.
पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या यादीत अनेक शिक्षक बोगस असून, या शिक्षकांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असतानाच शहरातील पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील नागरी परिसर महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या कामाला गती दिली जात आहे.
पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुणेकरांच्या अडचणींना तत्काळ मदत मिळण्यासाठी पुण्यात आणखी नवीन ५ पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. नव्या पाच पोलिस ठाण्यांची रूपरेषा निश्चित झाली आहे.
सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीचे सरासरी क्षेत्र दोन लाख ४६ हजार ६११८.७१ हेक्टर आहे. यापैकी ८४ हजार ८३६.४० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवतात? घोषणा केल्याप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी याच अधिवेशनात करा, नाहीतर सरकारच्या जुमलेबाजीला शेतकरी कधीच माफ करणार नाही, असं पटोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन कोण? सपकाळ? नया है वह, अशी प्रतिक्रीया दिली होती. फडणवीसांच्या प्रतिक्रीयेवरुन काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी यांनी टीका केली आहे.
फडके हौद चौक परिसरात श्री साईबाबा पालखी सोहळ्यात गर्दीतून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ९१ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
हातउसने दिलेल्या ४०० रुपयांवरून दोघांमध्ये वादावादी झाल्यानंतर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न कण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.