Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यात लाकडी बांबूने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 16, 2026 | 06:33 PM
आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

Follow Us
Close
Follow Us:
  • आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर
  • बांबूने मारहाण करून एकाचा खून
  • पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यात लाकडी बांबूने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात घडली आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मशाक गाजीबक्ष विजापुरे (वय ४३, रा. गजराज क्लब, लक्ष्मीनगर, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश वसंत शिंदे (वय ३४, रा. लक्ष्मीनगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी मशाक यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात काही कारणावरून वादविवाद झाले होते. तेव्हा मशाक याने यातील आरोपी गणेश शिंदे याला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. याचा राग शिंदे याच्या मनात होता. या रागातूनच त्याने मशाक याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केला. या घटनेनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी शिंदे याला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमा शेत परिसरात शेतातील घास कापल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दत्तात्रय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे व ओम दत्तात्रय कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमा शेत परिसरात राहणारा अमोल कापरे याने त्याच्या शेतात जनावरांसाठी घास लावलेला आहे, अमोल हे शेतात काम करत असताना शेतात आलेल्या दत्तात्रय कापरे याने शेतातील घास कापला, त्यामुळे कोणालाही न विचारता घास का कापला असे अमोल याने विचारले असता दत्तात्रय याने हातात कोयता घेऊन अमोलचा पाठलाग करत मी तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. अमोल हा जीव वाचवण्याच्या प्रयत्नाने पळत जाऊन दुचाकीवर बसून घरी जात असताना पुढे दत्तात्र्यची पत्नी सारिका कापरे व मुलगा ओम कापरे हे दोघे आले. ओम याने अमोलला गाठून अमोल कापरेशी दमदाटी केली. दत्तात्रय कापरे याने त्याच्या हातातील कोयत्याने अमोलच्या डोक्यावर वार करत गंभीर जखमी करुन तिघेही पळून गेले. यावेळी अमोल कापरे याच्या कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a man was beaten to death with a stick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
1

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

Pune Crime: 400 रुपयांत बनवली बॉम्बसदृश्य वस्तू, पुणे हादरवणारा आरोपी नागपूर स्टेशनवर जेरबंद; एटीएस चौकशी करणार
2

Pune Crime: 400 रुपयांत बनवली बॉम्बसदृश्य वस्तू, पुणे हादरवणारा आरोपी नागपूर स्टेशनवर जेरबंद; एटीएस चौकशी करणार

Pune Crime: पुण्यात RTE प्रवेशात मोठा भ्रष्टाचार? मोफत शिक्षणासाठी 50 हजार ते अडीच लाखांची मागणी
3

Pune Crime: पुण्यात RTE प्रवेशात मोठा भ्रष्टाचार? मोफत शिक्षणासाठी 50 हजार ते अडीच लाखांची मागणी

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही
4

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.