Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे शहरातील ड्रग्जचा पुरवठा सुरूच असून, पोलिसांकडून पाळेमुळे शोधली जात असतानाच 'ड्रग्ज तस्करी राजस्थान व्हाया पुणे' होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 12:30 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल 'इतक्या' कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल 'इतक्या' कोटींचे ड्रग्ज पकडले

Follow Us
Follow Us:
  • पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
  • 6 जणांना ठोकल्या बेड्या
  • ३ कोटी ९२ लाख रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त
पुणे : पुणे शहरातील ड्रग्जचा पुरवठा सुरूच असून, पोलिसांकडून पाळेमुळे शोधली जात असतानाच ‘ड्रग्ज तस्करी राजस्थान व्हाया पुणे’ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. थोडथोड्या प्रमाणात राजस्थानातून पुण्यात ड्रग्ज आणून त्याची विक्री होत असल्याचे कारवाईतून समोर आले. पोलिसांनी शहरात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करत ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ९२ लाख रुपयांचा एमडी हा ड्रग्ज जप्त केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली. यावेळी परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८), हरीष सुजना रामदेवासी (वय २२, रा. दोघेही वाघोली), योगेश उर्फ मनिष बाबुराम बिश्नोई (वय ३०, रा. चामु. जि. जोधपुर, राज्यस्थान), सचिन उर्फ एसके रमेशकुमार बिष्णोई (वय २०), अमित सुनिल घुले (वय ४०, रा. मांजरी) तसेच रतनलाल किष्णाराम जाठ (वय २०), रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग (वय ३४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खराडी पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

पुणे शहर पोलिसांनी २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस केल्यानंतर शहरातील ड्रग्जची पाळेमुळे शोधून काढली जात आहेत. पुरवठादारांसह छोटछोटे एजंट यांच्यावरही नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, पोलिसांनी १२ लाख रुपयांच्या एमडी विक्री प्रकरणात मोतीसिंह व हरीष या दोघांना पकडले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी हा एमडी राजस्थानातून आणत असल्याचे समोर आले. त्याचवेळी योगेश बिश्नोई राजस्थानातून पुण्यात एमडी विक्रीसाठी येणार असल्याचे समजता त्याला वाघोली येथून पकडत ३० लाख रुपये किंमतीच्या १५१ ग्रॅम एमडीसह पकडले. तर त्याचा मावस भाऊ सचिन उर्फ बिष्णोई हा देखील एमडी विक्रीस आला असता त्यालाही मांजरी भागातून पकडले. त्याच्याकडून ४ लाख ६५ हजारांचा एमडी जप्त केला. पण, त्याने मांजरीतील अमित घुले याला तब्बल ७९ लाख रुपयांचा ३९८ ग्रॅम एमडी विकला असल्याचे तपासातून समोर आले. यानंतर अमित घुले यालाही पकडण्यात आले.

या चौघांकडे एकत्रित तपास केला असता, आरोपी हे राजस्थानमधील रतनलाल जाठ याच्याकडून एमडी घेऊन तो पुण्यात विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या एका पथकाने राजस्थानमध्ये जाऊन कारवाई केली. तसेच, आरोपींच्या घरावर छापेमारी केली. सोबतच मुख्य आरोपी रतनलाल याला पकडले. त्याच्यासोबतच पुण्यातील एमडीच्या गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या रामकरण जाठ याला देखील पकडण्यात आले.

दोघांकडून वर्षभरापासून ड्रग्ज पुरवठा

गिफ्ट हाऊस व मोबाईल शॉपीच्या मुख्य धंदाच्या आडून मोतीसिंह व हरीष ड्रग्जची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. मोतीसिंह याचे वाघोलीत गिफ्ट हाऊसचे दुकान आहे. तर हरीष याने मोबाईल शॉपी सुरू केली होती. गेल्या वर्षांपासून ते एमडी विक्री करत असल्याचे तपासातून समोर आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली.

रतनलाल जाठ मुख्य पुरवठादार

पुण्यात राहून मोतीसिंह आणि हरीष ड्रग्जची विक्री करत होते. तर, योगेश आणि सचिन हे राजस्थानातून पुण्यात येऊन डिलर याच्याकडे थेट एमडी विक्री करून जात होते. नंतर ते पुढे थोड्याथोड्या प्रमाणात ग्राहकांना विक्री करत होते. अमित घुले हा या दोघांकडून एमडी घेऊन त्याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातून एका कारवाईचा धागा पकडून पोलिसांनी विक्री ते पुरवठा अशी साखळी उघडकीस केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाख रुपये किंमतीचा १९६० ग्रॅम एमडी जप्त केला आहे. सोबतच मोबाईल, महागडी कार आणि इतर ऐवज असा एकूण ४ कोटी २७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Web Title: Pune police has busted a drug racket and taken major action against 6 accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Drugs Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
4

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.