Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थर्टी फर्स्टला मद्य पिऊन वाहन चालवताय? मग सावधान; ‘या’ कायद्यानुसार थेट तुरुंगात रवानगी होणार, पोलिसांचा इशारा

New Year Party: पुणे पोलिसांनी शहरात ३१ डिसेंबरच्‍या सायंकाळपासून ३ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त ठेवला आहे. त्‍यांच्‍या दिमतीला ७०० वाहतूक पोलिस आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 30, 2024 | 07:29 PM
थर्टी फर्स्टला मद्य पिऊन वाहन चालवताय? मग सावधान; 'या' कायद्यानुसार थेट तुरुंगात रवानगी होणार, पोलिसांचा इशारा

थर्टी फर्स्टला मद्य पिऊन वाहन चालवताय? मग सावधान; 'या' कायद्यानुसार थेट तुरुंगात रवानगी होणार, पोलिसांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. येणाऱ्या 2025 या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताची सगळीकडे जोरदार तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. याच निमित्ताने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणेकरांना एक आवाहन केले आहे. मद्य प्राशन करीन वाहन चालवू नये असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

थर्टी फर्स्टला जर तुम्‍ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर आधी सावध व्हा. कारण पुणे पोलिसांकडून शहरात जागोजागी चौकात अशा तळीरामांवर ‘ड्रंक ॲंड ड्राईव्‍ह’ मोहिमेद्वारे कारवाई करण्‍यात येणार आहे. ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे जागोजागी वाहनचालकांची तपासणी करण्‍यात येणार असून त्‍यामध्‍ये जर मद्यपान करून चारचाकी किंवा दुचाकी चालवल्‍याचे आढळल्‍यास त्‍यांची रवानगी मोटार वाहन कायद्यानुसार थेट तुरूंगात केली जाणार आहे. म्‍हणून, पुणेकरांनी मद्य प्राशन न करता वाहन चालवू नये, तसेच शक्‍यतो घरातच राहून नव्‍या वर्षाचे स्‍वागत करावे, असे आवाहन पुणे पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी केले आहे.

नववर्षाचे स्‍वागत करण्‍यासाठी संपूर्ण शहर सज्‍ज झाले आहे. बाजारपेठा फुलल्‍या आहेत. हॉटेल्‍स, पब यांनी वेगवेगळ्या समारंभाचे (इव्‍हेंट) चे आयोजन केले आहे. परंतु, या काळात मद्यपान करून गाडी चालवण्‍यात येते. त्‍यामुळे, अपघात होण्‍याची दाट शक्‍यता असते. असे प्रकार होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी शहरात ३१ डिसेंबरच्‍या सायंकाळपासून ३ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त ठेवला आहे. त्‍यांच्‍या दिमतीला ७०० वाहतूक पोलिस आहेत. संपूर्ण रात्रभर हा बंदोबस्‍त राहणार असून गेल्‍यावर्षी जेथे जेथे वाहतूक कोंडी झाली होती तेथेही सीसीटीव्‍ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून ती कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

गर्दीच्‍या रस्‍त्‍यांवर विशेष लक्ष 

शहरात फर्ग्युसन महाविद्यालय रस्‍ता, जंगली महाराज रस्‍ता व कँपमधील महात्‍मा गांधी रस्‍ता येथे मोठया प्रमाणात गर्दी होते. तसेच वाहतूक कोंडी होते. गेल्‍यावर्षी या रस्‍त्‍यांवर वाहतूक कोंडी झाली होती. त्‍यावरून यावर्षी येथे अतिरिक्‍त पोलिसांचे नियोजन करण्‍यात आले आहे. तसेच अशा ठिकाणांवर सीसीटीव्‍ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्‍यात येणार आहे. तसेच आणखी १७ गर्दीचे ठिकाणे ओळखण्‍यात आली असून तेथेही विशेष लक्ष राहणार आहे.

हेही वाचा: हेही वाचा: Pune News: हा काय प्रकार! पुण्यातील पबकडून कंडोम आणि ओआरएस पाकिटांचे वाटप

हॉटेल, पबवरही राहणार लक्ष 
शहरातील ४० हॉटेल्‍सकडून नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी व इव्‍हेंट साजरे करण्‍यासाठी वेगवेगळ्या परवानग्‍या मागितल्‍या आहेत. त्‍यांना नियमात राहून या परवानग्‍या दिल्‍या आहेत. तसेच या परिसरात कोणत्‍याही नियमांचे उल्‍लंघन होणार नाही याची देखील खबरदारी त्‍यांनी घ्यायची आहे. तसेच यामध्‍ये अल्‍पवयीनांना मद्य न देण्‍याबाबतही सूचना दिल्‍या आहेत. तसेच त्‍यांचा वापर होणार नाही हे देखील सांगण्‍यात आले आहे.
ड्रंक ॲंड ड्राईव्‍ह ही कारवाई करण्‍यासाठी शहरात २३ ठिकाणे आधीच ओळखून तेथे अतिरिक्‍त पोलिस बंदोबस्‍त लावण्‍यात आला आहे. यामध्‍ये जो कोणी मद्य प्राशन करून वाहन चालवताना आढळून येईल त्‍यांच्‍यावर हयगय न करता कडक कारवाई करण्‍याच्‍या पोलिसांना सूचना दिल्‍या आहेत. त्‍याचबरोबर वेग मर्यादा न पाळता गाडी चालवणे, ट्रीपल सीट यांच्‍यावरही कारवाई करण्‍यात येईल. तर संपूर्ण शहरात साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्‍त लावला आहे.
– अमितेश कुमार, पोलिस आयुक्‍त, पुणे शहर

Web Title: Pune police has warned of action against drunk and drive drivers on 31 st decmber 2024 night latest pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 07:24 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन
1

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन

गोखले बिल्डर-स्मारक ट्रस्टमधील व्यवहार; Pune कोर्टाने दिला ‘हा’ मोठा आदेश
2

गोखले बिल्डर-स्मारक ट्रस्टमधील व्यवहार; Pune कोर्टाने दिला ‘हा’ मोठा आदेश

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर
3

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं
4

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.