Photo Credit- Team Navrashtra न्यु इअर पार्टीसाठी पुण्यातील पबकडून कंडोम आणि ओआरएस पाकिटांचे वाटप
New Year Celebration In Pune: नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पर्यटन स्थळांपासून शहरातील मोठ मोठे हॉटेल्ससह बुक झाले आहेत. या सगळ्यात पुण्यातून मात्र धक्कादायक बातमी समोर आली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टीत येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसची पाकीटे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट पबकडून देण्यात आलेल्या पाकीटांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यासह आजुबाजुच्या परिसररातील तरूण-तरूणी पबमध्ये जातात. पुण्यातील मुंढवा परिसरातील हाय स्पिरीट पबकडून न्यु इअर पार्टीसाठी निमंत्रितांना काही पाकीटे पाठवण्यात आली आहे. या पाकिटांमध्ये ओआरएसची पाकिटे आणि कंडोमही पाठवण्यात आले आहे. याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत हायस्पिरिट पबने स्पष्टीकरण दिले आहे. तरूणांमध्ये जनजागृती करण्यासाठी पबकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच, कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावाही पबकडून करण्यात आला आहे. पण अनेकांनी त्याविरोधात तक्रार केली आहे.
Top Marathi News today Live: DTC बस महिलांसाठी थांबवली नाही तर
नववर्षानिमित्ताने हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबकडून आपल्या नियमित ग्राहकांना म्हणजेच तरूण ग्राहकांना निमंत्रणे पाठवली होती. या निमंत्रणाच्या पाकिटांमध्ये पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस सोबतच कंडोमचे पाकिटही होते. पण पबने केलेले हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे,” असे या पत्रात लिहले आहे. पबच्या अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती आणि समाजात गैरसमज, चुकीच्या सवयी रुजवल्या जाऊ शकतात, असा धोका आहे,
दुसरीकडे या प्रकरणात काही जणांनी पोलिसांकडेही तक्रार केली असून पोलिसांनी या चौकशी सुरू केली आहे. पबमध्ये येणाऱ्या अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पब व्यवस्थापकांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. पण कंडोम वाटणे हा गुन्हा नसून जनजागृतीसाठी हे करण्यात आल्याचा दावा पबकडून करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
Game Changer Trailer: राम चरण-कियाराचा ‘गेम चेंजर’चा ट्रेलर यादिवशी होणार प्रदर्शित;
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचारी महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचाऱ्यांकडील मोबाइल संच चोरून नेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशातचं आता पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या गुरुवारी (२६ डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास बाणेर परिसरातून निघाल्या होत्या. काॅर्नर स्टोन इमारतीजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक थिटे अधिक तपास करत आहेत.