चंदीगड : पंजाबमधील (Punjab) फिरोजपूरमध्ये (Ferozepur) एक खळबळजनक घटना (Shocking News) समोर आली आहे. येथील बाजेवाला चौकात सोमवारी (२० फेब्रुवारी) रात्री एका महिलेवर चार अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
फिरोजपूरचे पोलीस अधीक्षक गुरमीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत. महिलेला कोणी भोसकले हे शोधण्यासाठी आपण तिची भेट घेऊ, असे त्यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.
#punjab के #firozpur में महिला पर हमले का वीडियो। चार नौजवान तेजधार हथियारों के साथ महिला पर हमला कर रहे हैं और वीडियो में पुलिस मुलाजम साइड पर खड़े हुए नजर आ रहे हैं। फिरोजपुर केंट के बाज वाला चौंक की घटना। महिला गंभीर जख्मी। pic.twitter.com/85WU08GwV2
— Harpinder Singh (@HarpinderTohra) February 20, 2023