Kalyan News : हॉर्न वाजवल्याचा राग अनावर; तरुणाला बेदम मारहाण, तक्रार मागे घेण्यासाठी मामालाही चोप
घरासमोर हॉर्न का वाजवला, या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील मोहन परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून तक्रार मागे घेण्यासाठी संबंधित तरुणाच्या मामालाही मारहाण करण्यात आली.
या घटनेत भाचा आणि मामा दोघेही जखमी झाले असून, याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुमार हे काम संपवून घरी परतत असताना मोहन परिसरातील रस्त्यावर गर्दी होती. त्यामुळे त्यांनी वाहनाचा हॉर्न वाजवला. त्यावेळी रस्त्यावर काही तरुण फटाके फोडत उभे होते. हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने या तरुणांनी अनिल कुमार यांना जाब विचारण्यास सुरुवात केली.
‘हॉर्न का वाजवला, आम्ही तुला दिसत नाही का?’ असे म्हणत त्यांनी अनिल कुमार यांना मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या मारहाणीच्या घटनेनंतर अनिल कुमार यांनी त्यांचे मामा संजय विराने यांच्यासह खडकपाडा पोलीस ठाणे गाठले. तेथे संबंधित तरुणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांत तक्रार केल्याची माहिती मिळताच आरोपींनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर आज सकाळी अनिल कुमार यांचे मामा संजय विराने यांनाही संबंधित तरुणांनी मारहाण केली.
Kalyan News : दहा तासांच्या संघर्षानंतर अखेर दफनविधी; केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला
तक्रार दाखल केल्यानंतरही मारहाणीचा प्रकार घडल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. कायद्याचा धाक न बाळगता भररस्त्यात दादागिरी करणाऱ्या आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मारहाणीमागील कारणे आणि संबंधित आरोपींची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.
Diva News: दिव्यातील डंपिंग ग्राऊंडला वारंवार आग; विषारी धुरामुळे दिवेकरांच्या आरोग्याला धोका!
Ans: घरासमोर रस्त्यावर हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून अनिल कुमार यांना काही तरुणांनी मारहाण केली.
Ans: कल्याण पश्चिमेतील मोहन परिसरात ही घटना घडली.
Ans: अनिल कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ती मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मामालाही मारहाण करण्यात आली.






