NCP Merger Maharashtra ( महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण )
याच दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनिकरणासाठी उत्सुक असल्याचे माहिती समोर येतेय. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठका सुरू आहेत.याच दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फार उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पार्थ पवार यांनी देखील शरद पवार यांची एक ते दोन वेळा भेट घेतलीय. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या गटाचं विलिनीकरण होणार का? अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. विलनीकरणाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे बीडमधून एक मोठी बातमी समोर आली.
FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई
एकीकडे विलनीकरणाची चर्चा असताना, बीडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचे दिसले आहे.यामध्ये गाळपेरा करताना खासदार बजरंग सोनवणेंनी पेरणी केली तर, आमदार विजयसिंह पंडितांनी यावेळी कासरा धरला. या भेटीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित एकत्र दिसले. ते फक्त एकत्रच आले नाहीत, तर कामाच्या ठिकाणी या दोघांनी एकमेकांची विचारपूस देखील केली आहे. दोघांमध्ये गप्पा देखील रंगल्याचं पहायला मिळाले.
दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात राबवलेल्या गाळपेरा कार्यक्रमादरम्यान बीड तालुक्यातील मनकर्णिका धरणावर हे दोन्ही नेते, एकत्र आल्याचं पहायला मिळालं.
Ans: शरद पवार आणि अजित पवार गटाच्या विलिनीकरणाबाबत सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत. मात्र, विलिनीकरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
Ans: शरद पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्या भूमिकांबाबत चर्चा सुरू आहे.
Ans: भूमिकेबाबत वेगवेगळ्या माहिती समोर येत आहेत. मात्र, त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही.
Ans:






