रासायनी/राकेश खराडे : एकीकडे नवरात्र सुरु असून दुर्गेच्या पूजा करण्यात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. स्त्रीशक्तीचा जागर म्हणून या उत्सव साजरा केला जातो. मात्र दुसरीकडे अजूनही स्त्रियांना आणि अल्पवयीन मुलींना लग्नाचं आमीष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. रायगडमधील रासायनी या ठिकाणी असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
तरूणीला लग्नाचं आमीष दाखवून आरोपीने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवले. कायदेशीर विवाह न करता पिडीतेशी खोटं बोलून तिची दिशाभूल केली. या मुलीने सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं पण सत्य काही वेगळंच होतं.रायगड जिल्हासहित राज्यात अल्पवयीन तसेच महिला तरुणी यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत त्यांना गर्भवती ठेवण्याची अनेक प्रकरण स मोर येत आहेत. अशातच आता रसायनी पोलिस ठाण्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांच्य़ा तपासानुसार, खालापूर तालुक्यात राहणाऱ्या पीडित तरुणीशी पनवेल तालुक्यातील 19 वर्षीय तरुणाने ओळख वाढवली. तरुणीसोबत हा आरोपी दीड वर्ष संपर्कात होता. हळूहळू या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर आरोपी तरुणाने वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र पिडितेने लग्न करण्याची अट घातली.
आरोपीने पीडित तरुणीबरोबर प्रेमाचा बनाव करीत तिच्याशी वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले. टक्का येथील आरोपीने त्याचे वय 19 वर्षे असतांना देखील ते वाढवुन 22 वर्षे सांगितलं. पीडितेसोबत कायदेशीर विवाह न करता विवाह संस्कार श्री समर्थ विवाह मंगल केंद्र कर्जत या ठिकाणी करून घेतल्याचा आरोप पीडितेने केला. त्यानंतर आरोपीने तिला नांदण्यास न नेता माहेरीच ठेवून तिच्याशी संमतीशिवाय वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यातील झालेल्या शारीरिक संबंधामुळे पिडित तरुणी ही गर्भवती राहिली.
पीडित तरुणी ही गर्भवती असल्याच माहिती आरोपी याला देत ती त्याला आरोपी यांच्या घरी नेण्यास सांगत असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेत होता. मात्र आरोपीने पीडित तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या देवून मनाविरुद्ध गर्भपात घडवून आणला.याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे पीडितेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शंनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे हे पुढील तपास करीत आहेत.