Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monkey Attack: माकडाच्या एका उडीने घेतला महिलेचा बळी! छतावर कपडे वाळत घालताना भयानक हल्ला…

Monkey Attack: माकडाच्या एका हल्ल्याने घेतला २८ वर्षीय महिलेचा बळी! राजस्थानमधील या थरारक घटनेने हादरले शहर... प्रचंड भीती आणि धक्क्यामुळे छतावरच काय घडले? पाहा सविस्तर वृत्त

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 17, 2026 | 04:56 PM
Monkey Attack: माकडाच्या एका उडीने घेतला महिलेचा बळी! छतावर कपडे वाळत घालताना भयानक हल्ला...

Monkey Attack: माकडाच्या एका उडीने घेतला महिलेचा बळी! छतावर कपडे वाळत घालताना भयानक हल्ला...

Follow Us
Follow Us:
  • कपडे वाळत घालणाऱ्या २८ वर्षीय महिलेवर माकडाने केला हल्ला
  • माकडाच्या ओराबाडण्यामुळे आलेल्या तीव्र भीती व धक्क्याने त्या बेशुद्ध
  • उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने माकडांच्या त्रासाविरोधात तीव्र संताप
Monkey Attack: राजस्थानच्या कोटा शहरातून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी आणि मन हेलावून टाकणारी दुर्देवी घटना समोर आली आहे. कोटा येथील कंसुआ भागात वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय रेणू भट्ट यांचा माकडांच्या भीतीमुळे आणि प्रचंड मानसिक धक्क्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छतावर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या एका तरुण महिलेला माकडांच्या हल्ल्यामुळे आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट पसरली आहे.

हेही वाचा: Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात…

पुढच्या काही क्षणांत घडला भयंकर प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, रेणू भट्ट या नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, नेमकं त्याच वेळी अचानक माकडांची एक मोठी टोळी छतावर आली. काही कळण्याच्या आतच त्यातील एका आक्रमक माकडाने रेणू यांच्या खांद्यावर अचानक उडी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावर व पाठीवर नखांनी जोरदार ओरबाडले. या अचानक झालेल्या भयंकर हल्ल्यामुळे रेणू प्रचंड घाबरल्या आणि तीव्र भीतीमुळे त्या घराच्या छतावरच कोसळल्या.

हेही वाचा: Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कुटुंबीयांचा आक्रोश; सायलेन्ट हार्ट अटॅक आल्याचा संशय

माकडाच्या भीषण भीतीमुळे आणि आलेल्या प्रचंड मानसिक धक्क्यामुळे रेणू यांना ‘सायलेंट हार्ट अटॅक’ आला असावा, असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. हल्ल्यानंतर त्या जागेवरच बेशुद्ध होऊन पडल्या. हा प्रकार कळताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला व त्यांचा आक्रोश सुरू झाला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, परिसरातील घरांच्या छतांवर आणि संपूर्ण कॉलनीमध्ये माकडांचा हैदोस मोठ्या प्रमाणावर वाढला असून, प्रशासनाने यावर तात्काळ नियंत्रण मिळवावे, जेणेकरून इतर कोणाचा जीव धोक्यात येणार नाही

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्देवी घटना नेमकी कुठे घडली आहे?

    Ans: राजस्थानच्या कोटा शहरातील कंसुआ भागात ही घटना घडली आहे.

  • Que: मृत महिलेचे नाव काय असून घटना कशी घडली?

    Ans: २८ वर्षीय रेणू भट्ट असे मृत महिलेचे नाव असून, छतावर कपडे वाळत घालताना माकडाने त्यांच्यावर हल्ला केला होता.

  • Que: महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?

    Ans: माकडाच्या हल्ल्यामुळे बसलेला प्रचंड मानसिक धक्का आणि भीतीमुळे त्यांना सायलेन्ट हार्ट अटॅक आला असावा, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Rajasthan kota rens bhatt monkey attack silent heart attack death sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • heart attack
  • Monkey Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.