सौजन्य फोटो - AI Gemini
चिपळूण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, सोमवारी सकाळी चिपळूण पोलीस स्टेशनच्या डायल ११२ वर एक कॉल आला होता. वालोप्यामध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाली. त्यावरून डायल ११२ च्या अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन खात्री केली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर, वालोप्यामधील झुलाई जनरल स्टोअर्सच्या मागच्या बाजूला ३३ वर्षीय नवनाथ बबन कांबळे (मूळ रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कांबळे हा चिपळूणमध्ये आपल्या बहिणीकडे राहत होता. तो काल (सोमवारी, १६ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजता घरातून बाहेर पडला होता, परंतु त्यानंतर तो घरी परतलाच नाही, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तेथे जमलेल्या लोकांची चौकशी केली असता, त्याच्या बहिणीचे पती वालोप्यावरील रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावले असता, त्यांनी हा आपला मेहुणा नवनाथ कांबळे असल्याचे ओळखले. नवनाथला दारूचे व्यसन असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून नवनाथच्या डोक्याच्या बाजूला आढळलेल्या जांभा दगडाने त्याच्या डोक्यात मारून किंवा ठेचून त्याची हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या गंभीर घटनेचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी तात्काळ जागेवर फॉरेन्सिक व्हॅन, श्वान पथक (Dog Squad) आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्याचे व लवकरात लवकर जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Ans: चिपळूणमधील वालोपे भागात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर झुलाई जनरल स्टोअर्सच्या मागे ही घटना घडली.
Ans: नवनाथ बबन कांबळे (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील वांगी (ता. कडेगाव) येथील होता.
Ans: चिपळूण पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत असून, घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.






