Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी राजेंद्र खेडेकरला दणका; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

आरोपांचे स्वरूप व गांभीर्य, आरोपींचा प्राथमिक सहभाग व भूमिका, तपासाची सद्यःस्थिती आणि व्याप्ती व आरोपीच्या पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यकता लक्षात घेता आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2026 | 11:54 AM
पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी राजेंद्र खेडेकरला दणका; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी राजेंद्र खेडेकरला दणका; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी डॉ. राजेंद्र खेडेकरला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (दि.29) अटक केली. न्यायालयाने त्याला तीन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या कथित भरती गैरव्यवहार प्रकरणात सहभागी आरोपींनी चौदाहून अधिक व्यक्तींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास पावणेतीन कोटींहून अधिक रक्कम लाटल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबनराव खेडेकर याच्यासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि अन्य आरोपींविरोधात शिवाजीनगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अक्षीक्षकांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार मे २०२२ ते मे २०२५ या कालावधीत महापालिकेच्या परिसरासह इतर ठिकाणी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी बेरोजगारांना पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

Indian Coast Guard : अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

आरोपींनी आपसांत संगनमत करून महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून बोगस नियुक्तीपत्रे तयार केली. त्यांनी उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही दिल्या; इतकेच नव्हे तर उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचे दाखविले, असे तक्रारींमध्ये नमूद आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर पसार

याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर पसार झाला होता. त्याने अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. नोकर भरतीचा सुनियोजित घोटाळा हा मोठ्या संघटित टाचा भाग असून, त्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे; तसेच अनेक बेरोजगार व्यक्तींचे आर्थिक नुकसान झाले आहे.

गुन्ह्याची व्याप्ती पाहता कोर्टाकडून पोलिस कोठडी

आरोपांचे स्वरूप व गांभीर्य, आरोपींचा प्राथमिक सहभाग व भूमिका, तपासाची सद्यःस्थिती आणि व्याप्ती व आरोपीच्या पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यकता लक्षात घेता आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते. या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेता न्यायालयाने आरोपी खेडेकरला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.

Beed Crime News : जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

Web Title: Rajendra khedekar an accused in pune municipal corporation recruitment scam case has been remanded to five days of police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Pune Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.