Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वनस्पती शोधण्यासाठी महाराज डोंगराकडे गेले नंतर 200 फूट दरीत कोसळले; उपचाराअभावी मृत्यू

वनस्पतीच्या शोधात गुरुवारी सकाळी मुर्डेश्वरच्या डोंगरावर गेलेले राजू बाबूराव राजगुरे ऊर्फ कमलगिरी महाराज सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2026 | 08:48 AM
दोनशे फूट दरीत राजू महाराज यांचा मृत्यू

दोनशे फूट दरीत राजू महाराज यांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

सिल्लोड : तालुक्यातील मुर्डेश्वर मंदिर परिसरात (केळगाव) वन औषधीच्या शोधात डोंगराकडे गेलेल्या महाराजांचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. गंभीर मार लागल्याने व उपचारास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

राजू बाबूराव राजगुरे ऊर्फ कमलगिरी महाराज (वय ५८, रा. जटवाडा छत्रपती संभाजीनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या महाराजांचे नाव आहे. राजू महाराज हे हरिनाम सप्ताहसाठी मुर्डेश्वर मंदिर परिसरात आलेले होते. वनस्पतीच्या शोधात गुरुवारी सकाळी मुर्डेश्वरच्या डोंगरावर गेलेले राजू बाबूराव राजगुरे ऊर्फ कमलगिरी महाराज सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळले. गंभीर जखमी झालेल्या महाराजांच्या बचावकार्य व उपचारास विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते श्री कमलगिरी मठ देवस्थान विश्वस्त मंडळाचे सदस्य होते. त्यांचा मठ जटवाडा रोडवरील हरिओमनगर येथील प्लॉट नं. २८ मध्ये आहे.

हेदेखील वाचा : लग्न करून घरी जाताना 150 फूट दरीत बस कोसळली अन्…; उत्तराखंड-नेपाळ सीमेवर भीषण Accident

दरीत अडकलेल्या महाराजांनी पत्नी व मुलगा वैभवशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. मात्र, मुलाला घटनास्थळी दाखल होण्यास दुपारचे ३ वाजले. नंतर बाहेर काढून रुग्णवाहिकेतून सिल्लोड रुग्णालयात नेताना त्यांची प्राणज्योत मालवली. महाराज गंभीर जखमी असले तरी पूर्णतः शुद्धीत होते. गंभीर मार लागल्याने व उपचारास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

सात तासांचे प्रयत्न अपयशी

घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली. मात्र, अतिशय दुर्गम व अवघड भूभाग असल्याने बचावकार्यास विलंब लागला. दरम्यान, मुर्डेश्वर येथील एकनाथ कोठाळे, समाधान कोठाळे व सीताराम इवरे यांनी मदतीसाठी धाव घेत दरीत उतरले. महाराजांना काढण्यासाठी ग्रामस्थांनी सुमारे २०० फुटांचा मार्ग तयार केला. मात्र, रस्ता अत्यंत अवघड होता. सकाळी ९ वाजेला दरीत कोसळलेल्या महाराजांना बाहेर काढण्यास दुपारचे ४ वाजले होते.

हेदेखील वाचा : Dharashiv Crime: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण; काँग्रेस कार्यकर्त्यांवर आरोप

Web Title: Raju maharaj died after falling into a gorge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • sillod news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.