Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क

शहरात किरकोळ वादातून खून, खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आठवड्यापूर्वी दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरून सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2024 | 05:39 PM
Crime News: पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क

Crime News: पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: ऐन दिवाळीत शहरात गोळीबाराची घटना घडली. येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एका टेम्पोचालकावर बंदुकीतून गोळीबार केला. गोळीबारात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा येरवड्यातील अशोकनगर परिसरात ही घडली घडली. शहानवाज शेख असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त लष्करी जवान श्रीकांत पाटील याला येरवडा पोलिसांनी अटक केली.

येरवडा भागातील अशोकनगर परिसरात पाटील आणि शहानवाज यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. रागातून पाटील याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेख गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पाटील याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके तपास करत आहेत.

शहरात किरकोळ वादातून खून, खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आठवड्यापूर्वी दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरून सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात तरुणावर अल्पवयीनांनी कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली होती.

नकली पिस्तुलाच्या मदतीने माजवली दहशत; दोघांवर गुन्हा दाखल

ऐन दिवाळीच्या हंगामात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण रस्त्यावर दोघांनी बंदुकीच्या मदतीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळीतील टिकल्या वाजवण्याचे पिस्तूल वापरुन ही दहशत पसरवण्याचा प्रयत्न दोघांनी केला. पुणे पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक केली आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दोन युवकांनी दिवाळीतील टिकल्या वाजवायची नकली पिस्तूल घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याकहा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील सिंहगड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव पूल तर वारजे या दरम्यान ही घटना घडली आहे. दोघेही तरुण व्यवसायाने पेंटर असल्याचे समजते आहे. दुचाकीवरून जात असताना नकली पिस्तूल त्यांनी हवेत फिरवली. त्यामुळे तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आता पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Pune News: मुंबई-बंगळुरू मार्गावर नकली पिस्तुलाच्या मदतीने माजवली दहशत; दोघांवर गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. कोयता गॅंग, हीट अँड रन, महिलांवरील अत्याचारांचे प्रकार, अपघाताची सत्र सुरूच आहेत. तर पुण्यात सायबर क्राईमच्या  घटना देखील वाढलेल्या दिसत आहेत. चोरीच्या घटना अशा सर्वच प्रकारचे गुन्हे वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुणे पोलीस कसोशीने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान आता पुण्यातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका रात्रीत पाच दुकाने फोडल्याची घटना घडली आहे.

 

Web Title: Retired army soldier firing at yerwada for parking problem pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 05:39 PM

Topics:  

  • Pune Crime

संबंधित बातम्या

Jalna Politics: भाजप उमेदवाराला समर्थन आणि पक्षाशी गद्दारी;काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता
1

Jalna Politics: भाजप उमेदवाराला समर्थन आणि पक्षाशी गद्दारी;काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर
2

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
3

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार
4

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.