Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War : भारत-पाकिस्तान तणाव वाढला; ग्रामीण भागातील पोलीस पाटलांना दिल्या महत्वाच्या सूचना

ग्रामीण भागातील पोलीस पाटलांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 10, 2025 | 01:04 PM
स्वातंत्र्यदिन, दहिहंडी उत्सवाच्या तयारीला सुरुवात

स्वातंत्र्यदिन, दहिहंडी उत्सवाच्या तयारीला सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:

मंचर : 22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला. बुधवारी 7 मेला भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने देखील सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून अंदाधुंद फायरींग करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान कडून भारतावर हल्ले सुरु आहेत. मात्र भारताच्या लष्कराने योग्य प्रत्त्युत्तर दिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पोलीस पाटलांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी त्यांच्या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्याला कळवावे असे सांगितले आहे. पुढील काही दिवसात युद्ध अजून भडकू शकते. त्यामुळे देशातील पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ग्रामीण भागात गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील यांना पोलिसांच्या वतीने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील पारगाव, मंचर, घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी गावोगावच्या पोलीस पाटलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गावात वाडी वस्तीवर पेट्रोलिंग करणे, गावात नवीन, संशयित नवीन व्यक्ती आढळल्यास पोलीस ठाण्याला कळवणे, दररोज गावात महत्त्वाच्या ठिकाणी मंदिरे, शाळा, कॉलेज, बँका, पतसंस्था इत्यादीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

Web Title: Rural villages have been advised to be on alert as tensions between india and pakistan escalate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • india pakistan war
  • PM Narendra Modi
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी
1

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका
3

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
4

20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.